ब्रेकिंग

अहमदनगर शहरातील सुप्रसिध्द डॉ. अरुण वैद्य यांचे घरी शसस्त्र दरोडा घालणारे दोन आरोपी 1,70,570/- रु. (एक लाख सत्तर हजार पाचशे सत्तर) रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख अशा मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि.२६ फेब्रुवारी (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 15/02/2023 रोजी फिर्यादी डॉ. श्री. अरुण जगन्नाथ वैद्य, वय 58, धंदा डॉक्टर, रा. फ्लॅट नंबर 302, वर्धमान रेसिडेन्सी, पटेल मंगल कार्यालया मागे, टिळक रोड अहमदनगर हे कुटूंबियासह रात्रीचे जेवण करुन झोपलेले असतांना रात्री 02.30 वा. सुमारास अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अनोळखी 6-7 इसमांनी फ्लॅटचे मुख्य दरवाजाची कडीकोंडा कटावणीने तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादी व त्यांची पत्नी यांना कटावणी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवुन 28 तोळे वजनाचे सोने व हि-यांचे दागिने तसेच 10 लाख रुपये रोख असा एकुण 21,20,000/- रु. किमतीचा मुद्देमाल दरोडा चोरी करुन चोरुन नेला होता. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 154/2023 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंढे, पोसई/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/मनोज गोसावी, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहीत येमुल, विजय धनेधर व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथके तात्काळ रवाना केली. विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी जावुन बारकाईने पहाणी करुन डॉ. वैद्य यांचे घरामध्ये घरकाम करणारे इसम, ड्रायव्हर व इतर काम करणारे तसेच घरी येत-जात असणारे इसमांबाब अधिक माहिती घेवुन आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, डॉ. वैद्य यांचे घरी मागिल 3-4 वर्षापासुन कामास असलेला आकाशसिंग जुन्नी, रा. संजयनगर झोपडपट्टी, काटवन खंडोबा, अहमदनगर त्याने त्यांचे इतर साथीदारासह सदर गुन्हा केला असुन तो माळीवाडा वेस अहमदनगर येथे त्याचे साथीदारासह उभा असुन कोठे तरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेशि दिले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ माळीवाडा वेस येथे जावुन संशयीतांचा शोध घेत असतांना पथकास दोन संशयीत इसम दिसले त्यांना शिताफीने ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना दोन्ही इसम पोलीस पथकाची चालु लागताच पळुन जावु लागले त्यांचा पाठलाग सुरु करता एक इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेला, त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. तसेच एका संशयीतास ताब्यात घेवुन त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) आकाशसिंग रघुविरसिंग जुन्नी, वय 19, रा. संजय नगर झोपडपट्टी, काटवन खंडोबा, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने डॉ. वैद्य यांचे मुळ घराचे बांधकाम सुरु असल्याने डॉ. वैद्य यांनी टिळक रोड अहमदनगर येथे एक फ्लॅट भाडे तत्वावर घेतला होता. त्यावेळी डॉ. वैद्य यांचे घरातील सामान शिफ्टींग करीता डॉक्टरांनी आकाशसिंग जुन्नी यास काही लोकांना सोबत घेवुन सामान शिफ्टींग करणे करीता सांगितले. त्यावेळी आकाशसिंग यांने त्याचे नात्यातील सागरसिंग व इतर 5-6 लोकांना सोबत घेवुन डॉक्टरांचे घरातील सामान शिफ्ट करुन दिले होते. त्यावेळी डॉक्टरांच्या पत्नी यांनी घरातील सोन्याचे व हि-याचे दागिने तसेच रोख रक्कम सुटकेसमध्ये भरतांना पाहिले होते याबाबत आकाशसिंग व सागरसिंग यांनी सोने व हि-याचे दागिने तसेच रोख रक्कम या बाबत त्याचे नात्यातील करणसिंग टाक रा. आष्टी, जिल्हा बीड यास माहिती दिली. त्यावरुन करणसिंग याने त्याचे इतर 5-6 साथीदारांना व सागरसिंग अशांना सोबत घेवुन डॉक्टरांचे घरी जावुन दरोडा टाकल्याची हकिगत सांगितली. तसेच चोरी केलेले सोने व हि-याचे दागिने व रोख बाबत विचारपुस करता त्याने पळुन गेलेला सागरसिंग याचेकडे गुन्ह्यातील सोने व रोख असले बाबत माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) सागरसिंग जुन्नी रा. संजय नगर झोपडपट्टी, काटवन खंडोबा, अहमदनगर असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपी आकाशसिंग यास पुढील कायदेशिर कारवाई करीता कोतवाली पोस्टे येथे हजर केले आहे.
दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे सागरसिंग जुन्नी याचेकडे गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याने त्याचा तात्काळ शोध घेणे बाबत पोनि/श्री. कटके यांनी आदेश देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे सागरसिंग जुन्नी हा अहमदनगर येथे लग्न समारंभा करीता आला असुन काटवन खंडोबा येथील म्हसनवाटा येथे लपुन बसलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी पथकास पंचाना सोबत घेवुन सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने वेशांतर करुन काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे जावुन झाडा खाली बसलेल्या एका इसमास शिताफीने ताब्यात घेतले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) सागरसिंग बलविरसिंग जुन्नी, वय 23, रा. संजय नगर झोपडपट्टी, काटवन खंडोबा, अहमदनगर असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये गुन्ह्यात चोरीस गेलेला 73,570/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 97,000/- रुपये किंमतीची रोख अशी एकुण 1,70,570/- रु.किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन कोतवाली येथे हजर केले आहे. पुढील कारवाई कोतवाली पोस्टे करीत आहे व गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अ.नगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अ.नगर, मा.श्री.अनिल कातकाडे साहेब, उविपोअ, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे