दादासाहेब रूपवते विद्यालयातील वस्तीगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुस्तके वाटप शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली : भिंगार शहराध्यक्ष जे.डी. शिरसाठ

अहमदनगर १२ एप्रिल ( प्रतिनिधी) : शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार
आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.
शिक्षण हा जीवनाचा आधार आहे.शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन भिंगार शहराध्यक्ष जे.डी. शिरसाठ यांनी केले
महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दादासाहेब रूपवते विद्यालयातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक फिरोज पठाण,शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे,शहर सचिव भाऊ साळवे,उपाध्यक्ष गणेश राऊत,बबलू भिंगारदिवे,सागर ढगे,प्रमोद आढाव,आदी उपस्थित होते तसेच दादासाहेब रूपवते संस्थेचे रजिस्ट्रार प्रा. बैचे सर,मुख्याध्यापक शेख सर,पर्यवेक्षक जयंत गायकवाड,कदम सर, आदी उपस्थित होते
जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी सांगितले की,वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजातील वंचित व गरजू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून काम करत आहे. वंचित बहुजन आघाडी हे राजकारण कमी व समाजकारण जास्त करते.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्येच नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी कायमच वंचित व गरजूंच्या पाठीशी उभे राहील असे ते म्हणाले.
मुख्याध्यापक शेख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन भिंगारदिवे सर मानले.