अतिदुर्गम ग्रामीण जिल्हा परिषद शाळेतील सम्राट घोडेस्वार ठरला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत

जामखेड दि. 15 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
जामखेड तालुक्यातील अवघड क्षेत्रातील बोराटे मोहिते वस्ती जि.प.शाळेतील विद्यार्थी कु.सम्राट शिल्पा अशोक घोडेस्वार याने अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. नगर शहरातील रेसिडेन्सीयल हायस्कूल या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली.
सम्राटच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे केंद्रप्रमुख श्री. सुरेश मोहिते यांच्यासह पिंपळगाव आळवा गावच्या सरपंच सौ. शोभाताई मोहिते व श्री.बाबासाहेब मोहिते तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनी मोहिते व शांतीलाल मोहिते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. सावता बोराटे श्री. जालिंदर मोहिते साहेब, डी एस कक्ष. ओ.ई.स. आणि काँस्लिंगचे संचालक श्री. दशरथ बिरंगळ सर यांनी देखील सम्राटचे कौतुक केले.तसेच शाळेतील शिक्षक श्री. मनोज दळवी सर श्री.अशोक घोडेस्वार सर श्री.सचिन जोरे सर यांचे त्याला अनमोल मार्गदर्शन लाभले.
सम्राटच्या या घवघवीत यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.