डॉ. शिंदे यांचे निःस्वार्थ भावनेने समाजातील वंचित घटकांसाठी काम : मुख्याध्यापक – भोसले स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांचा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल शाळेत सन्मान …..

अहमदनगर -(प्रतिनिधी) : स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे हे समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यास नेहमीच तयार असतात. प्रामाणिक व निःस्वार्थ भावनेने काम करून नगरचे नाव मोठे केले आहे. असे गौरवोद्गार सरदार वल्लभभाई पटेल छावणी परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू भोसले यांनी काढले. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरप्रिन्युरशिप अँड मॅनेजमेंट स्टडीज ऑटोनॉम्स वर्चुअल मोड युनिव्हर्सिटी मुंबईत मानद डॉक्टर प्रधान करून सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा शाळेचे मुख्याध्यापक राजू भोसले यांनी गौरव केला. सर्व ठिकाणी सन्मान होत असताना स्वतःच्या गावात सन्मान होणे हे खूप महत्त्वाचे आहे. असे यावेळी भोसले म्हणाले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजू भोसले, अरविंद कुडीया, रोहित परदेशी, शरद पुंड, अंकुश शेळके, सौ वैशाली सावंत, श्रीम. अश्विनी यादव, सोनाली झिरपे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.