पत्रकार रामराजे शिंदे यांच्या वर हल्ला करणाऱ्याला तात्काळ अटक करावी याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन

अहमदनगर दि. 14 मार्च (प्रतिनिधी )
नगर दिनाक 13 मार्च रोजी मौजे मढी ता.पाथर्डी येथे वैदू समाजाची मेळावा होणार असल्या कारणाने 11 मार्च ला वैदूवाडी शेजारी प्रियदर्शनी कॉलनी दत्त मंदिर येथे वैदु समाजाची नियोजन बैठक चालू असतांना सिंकदर बाबाजी शिंदे यांनी लोकराज्य बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व अहमदनगर परिवर्तन साप्ताहिकचे संपादक रामराजे शिंदे यांना लाकडाच्या दांडक्यानी पाठीमागून येऊन डाव्या खांदयावर जबर हल्ला केला.व असे म्हणाला की,परत कुठे दिसला तर तुझ्या भावाचा खून केला तसच तुझा पण खून करीन.अशी खुनाची धमकी दिली आहे.या हल्ला संदर्भात तोफखाना पोलिस स्टेशन येथे रामराजे शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
सिकंदर शिंदे याला तात्काळ पत्रकार हल्ला कायदयानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी.याबाबतचे निवेदन लोकराज्य बहुजन पत्रकार संघाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे,पत्रकार राम चव्हाण,महेश चव्हाण, सोमनाथ शिंदे संस्थापक सदस्य लोकराज्य बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,गणेश शिंदे , विशाल शिंदे आदी उपस्थित होते. आरोपी सिंकदर शिंदे यांच्याकडून माझ्या कुटुंब्यांना जिवास धोका निर्माण झाला आहे.व माझ्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे.व माझ्या कुटुंबाचे काही कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. करवाई करण्यास विलंब केल्यास लोकराज्य बहुजन पत्रकार संघाकडून येत्या ८ दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.असा इशारा लोकराज्य बहुजन पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रामराजे शिंदे यांनी दिला आहे.