गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गुन्हयातील ०७ वर्षापासून पकड वॉरंट मधील फरार आरोपी पुणे जिल्हयातून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची कारवाई!

अहमदनगर दि. ४ फेब्रुवारी (प्रतिनिधी)
मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश सो. अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचेकडील सेशन केस नंबर १७१ २०४५ मधील आरोपी नामे गणेश नाना शिरोळे मूळ रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेबाबत तोफखाना पो.स्टे. गुरनं ४८/२०१५ भादवि. कलम ३६३.३६६ (अ), ३७६ (२) (आय) सह पोस्को कलम ३ (अ). ४. ९ (एल). १० प्रमाणे दि. २५/०२/२०१५ रोजी गुन्हा दाखल होता. सदर आरोपीस अटक झाल्यानंतर तो जामीनावर सुटल्यानंतर फरार झाला होता. व अद्याप पावेतो मा. न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे मा. न्यायालयाने त्यास समक्ष हजर करणेकामी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर पकड वॉरंट जारी केले होते.
वरील गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके यांना सूचना देऊन पकड वॉरंट बजावणीकामी आदेशीत केले होते.
वरील आदेशाप्रमाणे मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश सो. अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचेकडील सेशन केस नंबर १७९/२०१५ बाबत श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी आरोपीबाबत माहिती काढून पकड वॉरंट बजावणीकामी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदारांनी वेळोवेळी कडा ता. आष्टी, जि. योड तसेच पुरंदर, जि पुणे याठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता.
श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा पाठपुरावा करून सदर वॉरंट वाजवणीकामी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, पोना. शंकर चौधरी, भिमराज खसे, रविकिरण सोनटक्के, दिलीप शिंदे, लक्ष्मण खोकले. पोको रविद्र घुगासे. योगेश सातपुते. मेघराज कोल्हे, चापोहेको/ संभाजी कोतकर यांचे पथक तयार करून सदरचे पकड वॉरंट बजावणीबाबत आदेश दिले होते.
त्यावरून नमूद पथक वॉरंटमधील आरोपी नामे गणेश नाना शिरोळे मुळ रा. कडा. ता. आष्टी, जि. बीड याचे एफड वॉरंट बजावणीकरीता कडा ता. आष्टी येथे त्याचे रहाते घरी व परीसरात गेले असता तो मिळून आला नाही. त्याचेचद्यल सखोल माहिती घेतली असता सदरचा आरोपी हा निरा ता. पुरंदर, जि. पुणे येथे वास्तव्यास असलेबाबत गोपनिय माहिती काढून वरील पथकाने तात्काळ निरा ता. पुरंदर येथे जाऊन तेथील परिसराची माहिती घेऊन व आरोपी रहावयास असलेल्या दायटिकाणाची खाशर माहिती काढून आरोपी नामे गणेश नाना शिरोळे यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी तोफखाना पो.स्टे.ला हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री प्रशांत खेरे. अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकडे, सा., उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे