बोगस डॉक्टर मुळे मृत पावलेल्या मुलीच्या मृत्यूसाठी डॉक्टरसह पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषद व तालुका आरोग्य अधिकारी व नगर तालुका पंचायत समिती BDO यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करा- प्रकाश पोटे

अहमदनगर दि.१ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- मौजे रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.सदर महिला ही बाळंतपणासाठी आपले वडील शंकर फुलमाळी रा- रुईछत्तीशी घरी आली होती. तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे तिला गावातीलच असणाऱ्या डी.बी. बोस या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे तिचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर डी.बी.बोस रुग्णालयाचा तथाकथित डॉक्टर/ चालक, ज्ञानेश्वर निवृत्ती पवार याची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाल्यानंतर त्याची वैद्यकीय सनद न आढळल्या मुळे त्याला बोगस डॉक्टर म्हणून घोषित करून त्याच्यावरती नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात व प्रथम दर्शनी बोगस डॉक्टरची चुक आहेच परंतु जेवढा हा बोगस डॉक्टर यात आरोपी म्हणून महत्वाचा वाटतो तेवढीच जबाबदारी अशा बोगस डॉक्टरवर किंवा दवाखान्यावर नियंत्रण ठेवत असलेल्या शासकीय यंत्रणेची देखील असुन
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तसेच नगर तालुका पंचायत समिती BDO यांच्यावर देखील सदोष
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे की कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय ओ.पी.डी. तसेच दवाखाने यांच्यातील डॉक्टर्स विषयी माहिती आणि त्यांच्या सनद यांच्या विषयी माहिती ठेवणे हे बंधनकारक आहे. वरील विषयावर शंका घेण्याचे कारण म्हणजे, रुईछत्तीशी या ठिकाणी हायवे लगतच पत्र्याच्या शेडमध्ये डी.बी बोस या नावाने मागील 25 ते 30 वर्षांपासून हे बोगस रुग्णालय सुरू होते. कालपर्यंत दररोज जवळपास दहा ते पंधरा रुग्ण या ठिकाणी ऍडमिट केले जात होते. रुग्णांना तर अक्षरशः पोत्यावर, चादरीवर, चटईवर झोपून ऍडमिट केले जात होते. या हॉस्पिटलचा काम पाहणारा आणि स्वतःला डॉक्टर म्हनवणारा ज्ञानेश्वर निवृत्ती पवार (बोगस डॉक्टर) हा व्यक्ती एडमिट असणाऱ्या रुग्णांकडून मोठ्या रकमेच्या स्वरूपात फी आकारत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणीच असणारे मेडिकल हॉटेल व्यवसायिक ज्या लोकांचे येथील येणाऱ्या रुग्णांमुळे आपले व्यवसाय चालत असल्याने, त्या बोगस ज्ञानेश्वर निवृत्ती पवार या व्यक्ती विषयी सर्व माहीती असताना देखील त्याला मदत करत होते. एवढ्या मोठ्या स्वरूपात सातत्याने गोरगरिबांच्या जीवाशी खेळणारा ज्ञानेश्वर निवृत्ती पवार हा जर हे रुग्णालय 25 ते 30 वर्षापासून चालवत होता तर यावर, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने किंवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तसेच नगर तालुका पंचायत समितीच्या BDO यांनी यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. एखाद्या पत्राच्या शेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रुग्ण येत आहेत व व्यवहार होत आहेत, या सर्व कामकाजा कडे आरोग्य विभागाची नजर का गेली नाही हा देखील संशयाचा विषय असुन आता ज्यावेळी एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झालाय त्यानंतर आरोग्य विभाग याविषयी चौकशी करते, म्हणजे कुठेतरी आरोग्य विभागाच्या कामकाजावर शंका उत्पन्न होत आहे. की या बोगस हॉस्पिटलचा चालक ज्ञानेश्वर निवृत्ती पवार यांचे आणि आरोग्य अधिकारी याचे काही लागेबांधे होते का या गोष्टीची चौकशी व्हायला हवी आणि या मुलीच्या मृत्यूस जेवढा हा बोगस डॉक्टर जबाबदार आहे, तेवढीच त्याला दुर्लक्षित करणारी जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार धरून त्यांच्या वर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि त्या निष्पाप मुलीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळवून देण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.