औरंगाबाद येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोर-कमिटीची बैठक संपन्न!

औरंगाबाद दि.८ जुलै (प्रतिनिधी)
दिनांक 5जुलै 2022 मंगळवार रोजी, सुभेदारी गेस्ट हाऊस (विश्राम भवन) येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोर कमिटीची अत्यंत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली .
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार, आदरणीय, प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या बैठकी प्रसंगी वर्तमान परिस्थितीतिल बदलत्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने तद्वतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसह पक्षाची राजकीय भूमिका निश्चित करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा करण्यात येऊन आगामी निवडणूक विषयक धोरण ठरवण्या संदर्भात निवडणूक निर्णय समिती गठित करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी , मार्गदर्शन करतांना आदरणीय प्रा .जोगेंद्र कवाडे सरांनी बैठकीमध्ये केली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रभारी माननीय
गोपाळराव आटोटे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या निवडणूक निर्णय समितीच्या निमंत्रक पदाची जबाबदारी प्रामुख्याने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते भाईजयदीप कवाडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे .
घोषित करण्यात आलेल्या या निवडणूक निर्णय समितीची बैठक लवकरच मुंबईमध्ये आयोजित केल्या जाणार असून त्यामध्ये आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता पक्षाची निवडणूक विषयक भूमिका ठरवली जाणार आहे. आणि त्यासंबंधीचा अहवाल अंतिम निर्णयाकरिता पक्षाध्यक्ष आदरणीय प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचेकडे सादर केल्या जाणार असल्याचेही औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
बैठकीला प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,भाईजयदीप कवाडे ,महाराष्ट्र प्रभारी गोपाळराव आटोटे ,राष्ट्रीय महासचिव अॅड .जे .के.नारायणे ,प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेशराव पडघन गुरुजी ,प्रदेश महासचिव बापूसाहेब गजभारे, प्रदेश संघटन सचिव प्रमोदराव टाले ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रत्नाताई मोहोड, यांचेसह विशेष निमंत्रित सदस्य, राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे ,मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय वाघमारे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष.डॉ.नंदकुमार गोंधळी, इत्यादी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोर कमिटीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.