राहुरी पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 03 आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे,मनोहर शेजवळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर,संदीप घोडके,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले,शंकर चौधरी,राहुल सोळुंके,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.20/01/2023 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 03 ठिकाणी छापे टाकुन एकुण 1,02,000 रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 1800 लि. कच्चे रसायन, 120 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 03 आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
आरोपीचे नांव
१) गणेश रमेश गायकवाड वय 24, रा. टाकळीमियॉ रोड, देवळाली प्रवरा, वडारवाडी, ता. राहुरी
२) रंगनाथ ऊर्फ दादा दिगंबर डुकरे रा. टाकळीमियॉ रोड, देवळाली प्रवरा, वडारवाडी, ता. राहुरी
३) रविंद्र ऊर्फ काळु दिगंबर डुकरे रा. टाकळीमियॉ रोड, देवळाली प्रवरा, वडारवाडी, ता. राहुरी
एकुण 03 पुरुष
12,000/- रु.कि.ची 120 लि. तयार दारु
90,000/- रु.कि.चे 1800 लि. कच्चे रसायन
सदरची कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम ,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे,मनोहर शेजवळ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर,संदीप घोडके,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले,शंकर चौधरी,राहुल सोळुंके,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,उमाकांत गावडे अंमलदार, कॉन्स्टेबल यांच्या पथकाने राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी
कारवाई केली आहे.