महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांच्या भेटीला! शेवगाव येथे अडवून पाणी देणार असल्याचे दिले लेखी आश्वासन! जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती हर्षदाताई काकडे यांचा दीड वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा आहे सुरू!

अहमदनगर दि.२७ डिसेंबर (प्रतिनिधी) स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेवगाव तालुक्यातील बेलगाव, अंतरवाली, वरखेड, सोनेसांगवी, सोनविहीर या गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे ही शोकांतिका आहे. या गावांची नावे शहरटाकळी सह २४ गावे पाणी योजनेत घातली पण ही योजनाच बंद आहे. याच गावातून भगवानगड पाणी योजना जात आहे पण त्यातही या गावांना न्याय न मिळाल्याने ग्रामस्थांना आज रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी शेवगाव येथे केले.
तालुक्यातील बेलगाव, अंतरवाली, वरखेड, सोनेसांगवी, सोनविहीर या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जीवन प्राधिकरणाच्या नगर येथील मुख्य कार्यालयावरती वरील पाच गावांचे नागरिकांचे बैठा सत्याग्रह आंदोलन नियोजित होते परंतु कार्यकारी अभियंता यांनी शेवगाव येथे अभियंता मृणाल धगधगे यांची टीम पाठवून त्यांना नगर निघतेवेळी सौ. हर्षदाताई काकडे यांच्या कार्यालयासमोर शेवगाव येथेच गाठून भेट घेतली. यावेळी त्यांनी वरील गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करू असे लेखी आश्वसन देऊन त्याच ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, विकास शिरसाठ, पिनू कापसे, आबासाहेब काकडे, विकास शिंदे, बंडू लोहकरे, भाऊसाहेब राजळे, पृथ्वीसिंग काकडे ,लक्ष्मण पातकळ, अकबर शेख, अशोक ढाकणे, सुनील गवळी, ज्ञानदेव खराडे, भागिनाथ शिरसाठ, आप्पासाहेब मडके, राजेंद्र थोरात, रंगनाथ जाधव, पांडुरंग जाधव, बाळासाहेब जाधव, हरिभाऊ लोहकरे, अर्जुन जाधव, उर्मिला जाधव, पार्वती पोकळे, अनिता जाधव, जिजा जाधव, छाया त्र्यंबके, जनाबाई भारस्कर, अनिता खरात, रसिया शेख, निर्मला काकडे, सुशिला डोंगरे, संगीता विखे, सुवर्णा विखे, शीला तेलोरे, मंदा तेलोरे, मंगल पातकळ, आसराबाई गायकवाड, शांता गीतखने, कौसाबाई काळे, शकुंतला सांगळे, महादेव पाटेकर, पांडुरंग तेलोरे, भगवान तेलोरे, बाबासाहेब काळे, शकुंतला सांगळे, सविता आठरे, बबनबाई ढेकळे, गयाबाई खंडागळे, इ. प्रमुख आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना सौ.हर्षदा ताई काकडे म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून या पाच गावांना पिण्याचे पाणी नाही. यापूर्वी वेळोवेळी या नागरिकांनी पाण्याची मागणी केली परंतु पाणी मिळाले नाही. त्यामुळे आम्ही कार्यकारी अभियंता अहमदनगर यांचे कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करणार होतो. परंतु तुम्ही आमच्या दारात आलात व पाणी प्रश्न सोडवता म्हणून आम्ही वारे साहेबांनी केलेल्या विनंतीमुळे नगर जाणे टाळत आहोत. त्यामुळे या गावच्या नागरिकांसाठी तुम्ही कोणत्याही मार्गाने पिण्याचे पाणी द्यावे अन्यथा महाआंदोलनाला हे नागरिक आलेलेच आहेत असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
यावेळी अॅड.शिवाजीराव काकडे म्हणाले की, तुम्ही समक्ष पाहत आहात की आंदोलनकर्त्या महिलांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्यांना खोटी आश्वासन देऊ नका. अन्यथा दि.२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असाच भव्य मोर्चाचे आयोजन आंदोलनकर्ते करतील. आज त्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवून आंदोलन स्थगित ठेवले आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला तडा जाऊ देऊ नका असेही यावेळी ते बोलतांना म्हणाले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता मृणाल धगधगे यांनी मा.वारे साहेबांशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेऊन वरील पाच गावांच्या पाण्यासाठी स्वतंत्र नवीन प्रस्ताव दि.१० जानेवारी २०२२ पर्यंत करून तो शासन दरबारी पाठवून आम्ही मंजुरी आणू असे लेखी आंदोलन करताना यावेळी देण्यात आले. यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पाच गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.