सीडी देशमुख लॉ कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अहमदनगर दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी)
सीडी देशमुख लॉ कॉलेज कायनेटिक चौक अहमदनगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे सचिव प्रा ना म साठे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे सार्वजनिक बांधकाम अहमदनगरचे अधीक्षक अभियंता माननीय श्री भरत कुमार बाविस्कर व कार्यकारी अभियंता माननीय पालवे साहेब बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी व्हाईस चेअरमन अशोक पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेत आलेल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी ताकवणे द्वितीय क्रमांक उमेश देवकर आणि आदर्श विद्यार्थी व प्रोत्साहन पर बक्षीस श्री पाटसकर सर यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय सागर गायकवाड तसेच प्राध्यापिका जमीन मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी देश स्तंभचे न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले मानव विकास चे अफसर शेख बहुजन रयत परिषदेचे संजय ताकवले यांनीही मार्गदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये सर्वश्री ईश्वर वाळुंजकर ,उमेश देवकर, श्री पाटसकर ,श्रीमती रेणुका पाचंगे, व श्री. बागवान यांची भाषणे झाली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी श्री विशाल राठोड अमित भोसले विनोद जाधव सतीश थोरात प्राध्यापकांना साहेब थोरात, प्राध्यापक गणबोटे, प्रा. सविता तांबे, यमुना रासकर, यांनी विशेष प्रयत्न केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे आयसी प्रिन्सिपल रियाज बेग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मेरा जानराव यांनी केले.