“दिगंबरा दिगंबरा…श्रीपाद वल्लभ दिगंबरा” गजराने देवगड नगरी दुमदुमली राष्ट्रीय ऐक्य जोपासून देशाचे वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न करा-गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज

नेवासा(प्रतिनिधी)सुधीर चव्हाण
भू लोकीचा स्वर्ग अशी जगभर ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुदेव दत्त पीठ श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती.सायंकाळी ६ वाजता गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी व शंखनाद करून भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.धर्म की जय हो प्राणीयोमे समभावना हो,विश्व का कल्याण हो असा जयघोष यावेळी करण्यात आला.राष्ट्रीय ऐक्य जोपासून देशाचे वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न करा सर्वांनी यासाठी हातात हात घालून काम करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.,
यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज,उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली.जन्म सोहळयाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य शरदगुरू काटकर व भेंडा येथील आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांनी केली यावेळी नेवासा येथील प्रसिद्ध गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी श्रीदत्त जन्माचा पाळणा म्हटला.त्यांना डॉ.मेधा करवंदे,सौ.संगिता शिंदे,सौ. शारदाताई घुले,सौ.जयश्रीताई शिंदे यांनी उत्कृष्ट साथ संगत केली
यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील,स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मातोश्री सौ.मीराबाई मते,सावखेडा येथील गिरी आश्रमाचे महंत कैलासगिरीजी महाराज श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज,महंत ऋषींनाथजी महाराज,कन्नड येथील आनंद चैतन्य महाराज,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील,विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे,डॉ.जनार्धन महाराज मेटे, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर,माजी खासदार चंद्रकांत खैरे,श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,पोलीस निरीक्षक विजय करे,सोनई येथील सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,होमगार्ड समादेशक अधिकारी बाळासाहेब देवखिळे, गंगापूर येथील युवा नेते संतोष माने,भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस नितीन दिनकर, मराठवाडा भक्त मंडळाचे संतसेवक बजरंग विधाते,गायक रामजी विधाते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले.श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने दत्त जन्म सोहळा परंपरेनुसार साजरा होत आहे,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी भक्तांच्या उद्धारासाठी देवगड येथे दत्तपीठ निर्माण केले आहे असे सांगून दत्त जन्म महिमा त्यांनी यावेळी बोलतांना विषद केला.,
सदर जन्म सोहळयाच्या प्रसंगी मेघडंबरी आकाराची पुष्पांनी सजावट करण्यात आली होती तर दत्त जन्म सोहळा सर्वांना पहाता यावा म्हणून रिप्लेक्शन मीडियाचे प्रमुख रविंद्र शेरकर यांच्या वतीने भव्य क्रिन पडद्यावरील प्रक्षेपणाची मोफत सेवा देण्यात आली होती.
श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांनी सुरू केलेल्या दत्तजयंती सोहळा परंपरेनुसार साजरा करण्यात आला यावेळी पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला.दत्तजयंती असल्याने पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगेचे रुपांतर नंतर मोठ्या दर्शनबारीत झाले.भाविकांना रांगेत व शिस्तीत दर्शन घेता यावे म्हणून नेवासा पोलीसांचे पथक, होमगार्ड पथक,पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीसांनी तर नेवासा तालुक्याचे होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्यासमवेत निष्काम सेवा देणाऱ्या होमगार्ड जवान व होमगार्ड महिला हे सेवा देण्यासाठी सज्ज झाले होते.देवगड भक्त परिवारातील स्वयंसेवक,सेवेकरी सेवाभावी मंडळ तसेच गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कामी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.
श्री दत्तजयंती निमित्त श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व देवगड दत्त पिठाचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळच्या सुमारास मंदिर प्रांगणात पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.यावेळी झेंडेकरी,टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. दत्तजयंती निमित्ताने यज्ञ मंडपात आयोजित दत्तयागाची सांगता गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या यांच्या होते श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली यावेळी झालेल्या दत्त योगाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेशदेवा गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
यावेळी भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिध्देश्वर मंदिर,मुख्य प्रवेशद्वारासह नव्याने देवगड प्रांगणात बांधण्यात आलेल्या दक्षिणात्य शिल्पकला साकारलेल्या प्रवेशद्वारावर केलेली भव्य विद्युत् रोषणाई उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरली होती. श्री दत्त जयंती सोहळयानिमित्त देवगड येथे मोठी यात्रा भरली होती यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.यात्रेत आलेल्या दुकानदारांना व्यवसायासाठी श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने जागेची व्यवस्था करण्यात आली होती.नेवासा,नगर,श्रीरामपुर गंगापुर या एस टी आगारातून भाविकांसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.पहाटे पासून रात्री पर्यंत भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीने मोठा उच्चांक केला होता.