सामाजिक
भारताचे प्रथम शिक्षण मंत्री भारतरत्न स्व.मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती महापालिकेत साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगर पालिकेत राष्ट्रीय महापुरुषांचे व नेत्यांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे केले जातात. त्या कार्यक्रमांची सुची प्रसिद्ध करण्यात येते. व महापालिके मार्फत साजरे होणारे कार्यक्रमामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी देशाचे प्रथम शिक्षण मंत्री भारतरत्न स्वातंत्र्य सेनानी स्व. मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती महापालिकेत साजरी करण्याची मागणी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी केली असता आज महानगरपालिकेमध्ये जयंती साजरी करण्यात आली असून स्व.मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना उपायुक्त प्रदीप पठारे, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुनशी, नगरसेवक आसिफ सुलतान, नगर सचिव तडवी, बाबा जहागीरदार, इंजि. अनिस शेख, जावेद रंगरेज आदी उपस्थित होते.