गुन्हेगारी

तीन फरार आरोपीना कर्जत पोलिसाकडून अटक, घरफोडी, जबरी चोरीचा प्रयत्न तसेच भांडण करून मोटरसायकल चोरी करण्यातील आरोपी

कर्जत दि.९ जुलै (प्रतिनिधी) :
कर्जत तालुक्यातील घरफोडी, जबरी चोरीचा प्रयत्न तसेच भांडण करून मोटरसायकल चोरी करण्यातील तीन फरार आरोपीना कर्जत पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केली असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २२ रोजी जलालपूर (ता.कर्जत) येथील यमुनाबाई तुळशीराम काळे यांच्या खोप्यामध्ये घुसून साहित्य चोरी करत असताना फिर्यादीने विरोध केला असता त्यांना जबर मारहाण करून साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील ऐवज मारहाण करून जबरी चोरी केल्याबाबत १७६/२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सिद्धटेक येथे ५५/२२ प्रमाणे चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर आरोपी गुन्हा घडल्यानंतर कर्जत पोलिसांनी निष्पन्न करून पोलिसांनी फरार आरोपींचा वारंवार शोध घेतला असता मिळून येत नव्हते. यासह कोर्टाच्या कामासाठी उसने घेतलेल्या पैशांची मागणी केल्याने चौघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडफेक करून, पुन्हा पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसुत्र गहाळ झाले असुन आरोपींनी मोटारसायकलचीही चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात जलालपूर (ता.कर्जत) येथील राजू रमेश चव्हाण, कोक्या उर्फ मयूर रमेश चव्हाण, अनिता राजू चव्हाण आणि रमेश आमद्या चव्हाण या चौघांवर भा.द.वी कलम ३३७, ३७९, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील सर्वां विरुद्ध कर्जत पोलिसांनी विशेष मोहीम राबवून यामध्ये राजेंद्र रमेश चव्हाण, मयूर उर्फ कोक्या रमेश चव्हाण, परश्या रमेश चव्हाण यां तिघाना अटक केली असून त्यांना न्यायालय समोर हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सुनील खैरे, भाऊ काळे, संपत शिंदे, संभाजी वाबळे यांनी पार पाडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे