श्री विशाल गणेश मंदिरात फटाका असोसिएशनचे वतीने महाआरती व देणगी

नगर – दि:28 सप्टेंबर (प्रतिनिधी )अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने श्री गणेशोत्सव निमित्त श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा येथे महाआरती असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव व सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते करण्यात आली. या वेळी श्री विशाल गणेश मंदिराचे अध्यक्ष अभयजी आगरकर उपस्थित होते.
सदर महाआरतीस असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देविदास ढवळे,
अरविंद साठे, संजय जंजाळे, संजय सुराणा, दाजी गारकर, मयूर भापकर, रमेश बनकर, विकास पटवेकर, नाना आरे, सागर हरबा, पोपटानी, राजेंद्र छल्लानी, विजय मुनोत आदी उवस्थित होते.
या प्रसंगी असोसिएशन चे वतीने अध्यक्ष सुरेश जाधव व सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी श्री विशाल गणेश मंदिरास आर्थिक देणगी राष्ट्रीय सेवक संघाचे जेष्ठ सदस्य राजाभाऊ मुळे यांचे हस्ते दिली. या वेळी केमिस्ट असोसिएशन चे सुधीर लांडगे मा. नगरसेवक किशोर बोरा व मंदिराचे इतर ट्रस्टी उपस्थित होते.