7 फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले,ताब्यात

अहमदनगर दि. १५ सप्टेंबर (प्रतिनिधी)
मा. श्री. राकेश आलो साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद अनुषंगाने जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ संदीप पवार, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, संदीप दरदंले, संतोष लोढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, पोकॉ/मच्छिंद्र बर्डे व जालिंदर माने अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन रवाना केल्याने पथकाने केलेली कारवाई खालील प्रमाणे –
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गंभीर गुन्ह्यातील ताब्यात घेतले फरार व पाहिजे आरोपी खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं. व कलम अटक आरोपी
1. तोफखाना गु.र.नं. 435/18 भादविक 363 1) राहुल बाळु सोनवणे रा. वारुळाचा मारुती मंदीर, दातरंगेमळा, अहमदनगर
2. कोतवाली गु.र.नं. 592/23 भादविक 354, 506, 504 पोक्सो 8 सह आर्म ऍ़क्ट 4/25 1) रामा संतवीर ठाकुर रा. पंचशिलनगर, भिंगार, ता. नगर
3. नेवासा गु.र.नं. 144/22 भादविक 420, 306 1) निलेश भाऊसाहेब शिंदे रा. ड्रीमसिटी, कल्याण रोड, अहमदनगर
2) भाऊसाहेब सदाशिव सालके, रा. भिस्तबाग अहमदनगर
3) भुषण आनंदा चेमटे रा. भाळवणी, ता. पारनेर
4) बाळासाहेब दगडु सालके रा. शिवनेरी हाईट्स, जाधव नगर, अहमदनगर
4. शेवगांव गु.र.नं. 101/22 भादविक 420, 465, 467, 468 1) बाबामियॉ हसन सय्यद रा. बोधेगांव, ता. शेवगांव
पथकाने अभिलेखावरील फरार -1 व पाहिजे – 6 असे गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील एकुण -07 आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता संबंधीत पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उविपोअ, नगर शहर विभाग व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उविपोअ, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.