भिमक्रांती बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने पाईपलाईन रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सोसायटी फॉर वुमन अवरनेस अॅण्ड रिहॅबीलेटशन सामाजिक संस्थेकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१व्या जयंती निमित्त अभिवादन

अहमदनगर दि.१५ (प्रतिनिधी)- नगर शहरातील पाईपलाईन रोड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.पाईपलाईन रोड येथील सुखसागर कॉलनीमध्ये भिमक्रांती बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठान व सोसायटी फॉर वुमन अवरनेस अॅण्ड रिहॅबीलेटशन सामाजिक संस्थेच्या वतीने
बाबासाहेबांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी भिमक्रांती बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठाणचे महेश देठे,प्रविण सुर्यवंशी सर,बी.आर.सातपुते सर,अनिल ठोकळ,सुनिल मोकळ,उत्तम पवार,विकी साठे,संतोष वाणी,तुषार डफळ,वैभव साळुके,संजय जाधव,शरद साळवे,योगेश ठुबे,राजेंद्र नाना तागड, चर्मकार महासंघाचे नेते शिवाजी साळवे,शेेखर तुंगार,संदिप म्हस्के,धनंजय तागड,काशिनाथ शिंदे,प्रमोद पगारे, दैनिक अहमदनगर घडामोडीचे निवासी संपादक बाबा जाधव,आवाज महाराष्ट्राचे संपादक सुशिल थोरात,देैनिक अहमदनगर घडामोडीचे संपादक मनोज मोतीयानी,लोकशाही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी संतोष आवारी इ.ऊपस्थित होते.या वेळी नगरसेवक सागर बोरुडे नगरसेविका दीपालीताई बारस्कर यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्या बद्दलची माहीती दिली.सोसायटी फॉर वुमन अवरनेस अॅण्ड रिहॅबीलेटशन सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अॅड. संगीता पाडळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांचे महिला विषयक धोरण, सामाजिक कार्य या विषयी माहीती दिली.यावेळी संस्थेच्या सदस्या नम्रता पटेकर,बनुबाई मोकळ,सविता ठोकळ,प्रियांका गायकवाड,पवार मॅडम,साळवे मॅडम,देठे मॅडम इ.ऊपस्थीत होते.