लालेसाहेब बालेसाहेब यात्रोत्सव जंगी कुस्त्याने साजरा होणार!

राहुरी (प्रतिनिधी) ः
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेले हजरत लालेसाहेब बालेसाहेब दर्ग्याचा यात्रोत्सव १२ जानेवारी ते १४ जानेवारी या काळात संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
गावातील तंटामुक्त समितीच्या कार्यालयात ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सोपानराव नारायणराव गाडे हे होते. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार, यात्रा कमिटीचे सचिव नबाब पटेल, वसंतराव गाडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे, रफिक ईनामदार, नजीर काकर, समीर पठाण, मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष शौकतभाई ईनामदार, रियाजभाई देशमुख यांनी यात्रोत्सवबाबत चर्चा केली. याप्रसंगी सालाबादप्रमाणेच संदल १२ जानेवारी, १३ जानेवारी रोजी ऊरूस व जगीं कुस्त्याचा हगामा १४ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहिर झाले. हजरत लालेसाहेब बालेसाहेब यात्रोत्सव शांततेने साजरा करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पवार यांनी केले. सरपंच निवृृत्ती देशमुख, अॅड. पंढू तात्या पवार, श्रीराम गाडे, हमीदभाई ईनामदार, बाबाभाई इनामदार, सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार, संतोष शिंदे, अनिल देवकर, आरीफ देशमुख, दगडू पवार, जुल्लूभाई पिरजादे, खतीबभाई देशमुख, युवराज गाडे, कादर देशमुख, अहमद पटेल, जालुआबा गाडे, बापु मंडलिक, जनार्दन कोहकडे, भाऊसाहेब मोरे, अमजद पिरजादे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार्या कुस्त्याचा हगाम्यामध्ये नामवंत मल्ल हजेरी देणार आहेत. यात्रोत्सव साजरा करताना सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.