ब्रेकिंग

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गावठी बनावटीचे पिस्तूल व घातक शस्त्रासह नगर तालुका केली अटक!

अहमदनगर (प्रतिनिधी)दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गावठी बनावटीचे पिस्तूल व घातक शस्त्रासह अटक करण्यात नगर तालुका पोलिसांनी यश आले असून या टोळीकडून १ लाख १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बातमीची सविस्तर हकीकत अशी की,
दि.05/11/2022 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सपोनि राजेंद्र सानप, पोसई रणजीत मारग पोसई चव्हाण, सफो भगवान गांगर्ड, पोहेकॉ / 1958 सोनवणे, पोहेकॉ/953सरोदे, पोहेकॉ 1 389लगड, पोना / 1139 ठाणगे, पोना 01 शिंदे, पोर्का/11897 खड पोकों/2147बोराडे, पोकों / 896 जाधव, पोकों/ 2106खेडकर व पोकों/1513 बांगर असे पोस्टे हद्दीत सरकारी वाहन के MH-16-N-510 व खाजगी वाहणासह नगर तालुका पोस्टे गुरनं 766/2022 भादवी कलम 397,394,34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीताचा कमी व तसेच कोम्बिंग ऑपरेशन कामी पोस्टे हददीत रवाना होवुन रुईछत्तीशी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि श्री राजद्र सानप यांना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली आहे, की अजय गजानन काळे रा तांबेमळा बुरुडगाव जि. अहमदनगर हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह तीन मोटार सायकलीवरून घातकी हत्यारासह रुईछत्तीशी ते वडगाव तांदळी जाण या रोडने कुठेतरी दराडा घालण्यासाठी जात आहेत. त्यावरुन रुईछत्तीशी ते वडगाव तांदळी रोडवर वडगाव तांदळी शिवारात जाणा-या रस्त्यावर सापळा लावून बातमीप्रमाणे इसम नामे अजय गजानन काळे हा व त्याचे साथीदार येण्याची वाट पाहत रोडचे कडेला झाडाझुडपाचे आडबाजुला दबा धरुन बसला असता दि-05/11/2022 रोजी रात्री 20/15 वाजेचे सुमारास रुईछत्तीशी बाजुकडुन वडगाव तांदळी गावाकडे लो मोटारसायकल येताना दिसल्या. तेव्हा सपोनि सानप सो व आम्ही सदर मोटारसायकल यांना थांबण्याचा इशारा करुन त्यांना थांबविल असता आम्हाला एका मोटारसायकलवर अजय गजानन काळे हा गाडी चालवित असलेला दिसला. तेव्हा आमची बातमी प्रमाण खात्री झाली असता आम्ही सर्व पोलीस स्टाफने गाडीवर बसलेल्या सर्व पाचही इसमांना जागेवरच पकडले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितले तो पुढीलप्रमाणे. 1) अजय गजानन काळे, वय 20 वर्ष रा तांबेमळा बुरुडगाव जि. अहमदनगर 21 भागुजी भोसले, वय 30 वर्ष रा निमगाव चोभा ता आष्टी जि बीड 3) गिरधर पुंजाबाप्पु भोसले, वय 50 वर्ष रा. निमगाव चोभाता आष्टी जि बीड 4) हरिदास आगुचंद काळे वय 45 वर्ष रा. वाकी ता आष्टी जि बीड व पळून गेलेल्या इसमाचे नाव 5) हर्षल हबऱ्या काळे रा. देवूळगाव सिद्धी ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. उर्वरीत ताब्यात घेतलेल्या 4 इसमाची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात पुढील वर्णणाचा किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
1) इसम नामे अजय गजानन काळे याचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे…
A) 20,000/- रु. कि. ची एक स्टील बॉडी असलेला व ग्रीपला विटकरी रंगाची फायबरचा कव्हर असलेला गावठी बनावटीचे पिस्तूल त्यात मॅगझीन असलेला जु. वा. किं.अं.B) 100/- रु किं चे एक जिवंत काडतूस कि.अ.
C) 30,000/-रु. कि. ची हिरो कंपनीची हन्क मोटारसायकल तिचा. क्र. M11-16-AP-9783 जु.वा. कि. अं. (D) 2,000/- रु. कि. चा स्काय ब्लू रंगाचा XIAOMI कंपनीचा मोबाईल त्यात सीमकार्ड नसलेला जु.वा. कि. अ 2) इसम नाम शक्ती भागुनी भोसले याचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे… A) 200/- रू. कि चा 13 इंच लांबीचा चाकू त्याची लोखंडी मुठ 5 इंच लांबीची व त्याचे लोखंडी धारधार पाते 8 इंच लांबीचे वक्राकार आकाराचा जु.वा.कि.अ. (B) 5,000/- रु. किं.चा एक काळ्या रंगाचा ओप्पो कंपनीचा A 5 2020 मॉडेलचा मोबाईल त्यात 9763536638 या क्रमांकाचे सीमकार्ड असलेला. जु.वा. कि. अं. 3) इसम नामे गिरधर पुंजाबाप्पू भोसले याचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे.. (A) 30,000/- रु. कि. ची काळसर रंगाची हिरो होंडा कंपनीची सुपर स्पेल्डर मोटारसायकल तिचा क्र. MH
23-8-8227 जु.वा.कि.अ. B) 1,000/- रु. कि. चा सफेद रंगाचा itel कंपनीचा मोबाईल त्यात 7798090538 या क्रमांकाचे सीमकार्ड
असलेला जु.वा.कि.अं. 4) इसम नामे हरिदास आगुचंद काळे यांचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे.. A) 25,000/-रु. कि. श्री काळ्या रंगाची व त्यावर लाल-निळे रंगाचे पट्टे असलेली हिरो होंडा कंपनीची स्पेल्डर मोटारसायकल क्र. MH-23- AK-2446 जु. वा. कि. अं. B) 200/- रू कि चा 16 इंच लांबीचा एक चाकू त्याचे धारधार पाते। इंच लांबीचे व त्यास लाकडी मूठ 5 इंच
लांबीची जू.वा.कि.अं.
1,13,500/- येणेप्रमाणे वरील वर्णणाचा व कि.चे दरोड्याचे साहित्य, साधने वरील इसमांकडे मिळून आल्याने त्याच्याकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले तेव्हा आमची सदर इसम हे कोठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर सदर इसमांना मुद्देमालासह पोलीस स्टेशन आणून नगर तालुका पो. स्टे गु.र.नं. 784/20022 भा.द.वि कलम 399,402

भारतीय हत्यार कायदा कलम- 3/25.4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन वरील वर्णनाची घातक शस्त्रासह वाहने व मुद्देमाल असा एकूण

1.13.500/- जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे अजय गजानन काळे रा. तांबेमळा, बुरुडगाव ता. जि. अहमदनगर याच्यावर यापूर्वी दाखल असणाने गुन्हे खालील प्रमाणे 1) नगर तालुका पो. स्टे गु.र.नं. 414 / 2021 भा.द.वि. कलम 395,420, 120 (ब) प्रमाणे
आरोपी नामे हर्षल हबऱ्या काळे रा. देऊळगाव सिद्धी ता. जि. अहमदनगर
1 नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.554/2019 भा.द.वि कलम 395,420 प्रमाणे 2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं.208/2020 भा.द.वि कलम 457,380.411, 34 प्रमाणे 3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 147/2011 भा.द.वि कलम 399,402 प्रमाणे 4) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं.291/2019 भा.द.वि कलम 399,402 प्रमाणे 5)पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.114/2013 भा.द.वि कलम 395 प्रमाणे
6) दौंड जि. पुणे पोलीस स्टेशन गु.र.नं. 283/2013 भा.द.वि कलम 395,420,379 प्रमाणे
मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस स्टेशन, पो.उप.नि. युवराज चव्हाण, पो.उप.नि रणजित मारग, सफो भगवान गांगर्डे, पोहेकॉ भानुदास सोनवणे, पोहेकॉ / शैलेश सरोदे, पोहेकॉ / संतोष लगड, पोना / योगेश ठाणगे, पोना/ राहूल शिंदे, पोकों/ सोमनाथ वडणे, पोकॉ/ संभाजी बोराडे, पोकों/ संदीप जाधव, पोकों/ राजू खेडकर व पोकों/ जयदिप बांगर यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे