७ जण अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिने हद्दपार!

अहमदनगर प्रतिनिधी:-जिल्हयात संघटीतपणे टोळी तयार करुन नेवासा व परिसरात शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुख रवि राजु भालेराव (वय ३२, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) व त्याचे टोळीतील इतर ६ सदस्यांना अहमदनगर जिल्हयातून १८ महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती हद्दपार प्राधिकरण जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.टोळीप्रमुख रवि राजु भालेराव ( वय ३२, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर), टोळीसदस्य सतिष लक्ष्मण चक्रनारायण ( वय २६, रा. नेवासा खुर्द, ता नेवासा, जि. अहमदनगर), शंकर -दत्तु अशोक काळे (वय ३२, रा. नेवासा फाटा, ता नेवासा, जि. अहमदनगर), निखील किशनलाल चंदानी, (वय २७, रा. नेवासा फाटा, ता नेवासा, जि. अहमदनगर), नितीन / मुन्ना / असिफ महम्मद शेख ( वय ३२, रा. नेवासा खुर्द, ता नेवासा), रवि / रविंद्र शिवाजी शेरे (वय २८ , रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर), शिवा अशोक साठे ( वय २९, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी हद्दपार करण्यात आलेल्याची नावे आहेत.दरम्यान गुन्ह्यांबाबत टोळी प्रमुख व टोळीसदस्यांची सर्व चौकशी करून टोळीपासून नेवासा पोलीस ठाणे हद्दीत व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची सर्वसामान्य नागरीकांमध्ये असलेली दहशत कमी व्हावी. टोळीच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीचे टोळीप्रमुख व टोळीतील ६ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई करुन १८ महिनेकरीता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतून दि. ३ मार्च २०२२ रोजी हद्दपारीचा अंतिम कारवाई करुन हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.