कृषीवार्ता

शेतकऱ्यांचा तब्बल १० एकर ऊस जळून खाक! संगमनेर तालुक्यातील घटना अंदाजे २० लाखेंचे झाले नुकसान!

संगमनेर( प्रतिनिधी) भीषण आगीत शेतकऱ्यांचा तब्बल १० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी वीज वाहक तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या भीषण आगीत येथील पाच शेतकऱ्यांचा तब्बल १० एकर ऊस जळून खाक झाला.या शेतकऱ्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ पायथ्यालगत सावित्रीबाई दत्तू साबळे यांची गट नंबर २११/३,विठाबाई लक्ष्मण साबळे यांची गट नंबर २११ / ४,उज्ज्वला शिवराम साबळे यांची गट नंबर २११ / ४, बनाजी बाळाजी साबळे यांची गट नंबर २१४ / ३ व मधुकर सखाराम ठोसर यांची गट नंबर १८८ मध्ये ऊसाची शेती आहे.शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वीज वाहक तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या खाली पडल्यामुळे ऊसातील पाचटाने पेट घेतला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.अग्नीसह धुराचे मोठे लोळ आकाशाकडे जात असल्याचे लक्षात आल्यामुळे स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी अग्नीने उग्र रूप धारण केलेल्या ऊसाच्या शेताकडे धाव घेतली.यावेळी सरपंच पुंजाहरी शिंदे,ग्रामपंचायत सदस्य बकचंद साबळे,लक्ष्मण साबळे,विठ्ठल साळुंखे,कैलास गोराणे, जयराम कांदळकर, कचर शिंदे, भिका कांदळकर, दौलत बनवाले, साहेबराव उंबरकर, झुंगा साबळे, जगन शिंदे, शिवराम साबळे, मधुकर ठोसर, बनाजी साबळे, जिजाभाऊ शिंदे, विनायक कांदळकर, कारभारी साबळे, धोंडीबा बनवाले, दत्तु शिंदे यानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे शेजारी असलेला शेकडो एकर ऊस वाचविण्यात त्यांना यश आले.यावेळी संगमनेर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असला तरी, तोपर्यंत तब्बल १० एकर ऊस जाळून खाक झाला होता. त्यामुळे सावित्रीबाई दत्तू साबळे, विठाबाई लक्ष्मण साबळे, उज्ज्वला शिवराम साबळे, बनाजी बाळाजी साबळे, मधुकर सखाराम ठोसर या पाच शेतकऱ्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे