सामाजिक
संरक्षण सेवानिवृत्त वेतनधारकांचे हयातीचे दाखले नागरी सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरण
अहमदनगर,दि.१८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – संरक्षण विभागातील सेवानिवृत्त वेतनधारक स्पर्श पेन्शन प्रणालीमध्ये जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) जवळच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क सादर करु शकणार आहेत.
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) – अलाहाबाद व नागरी सुविधा केंद्र (सीएससी) यांच्यामध्ये ०७ मार्च २०२२ रोजी सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार ही सुविधा नागरी सुविधा केंद्रामध्ये सुरु करण्यात आली असून संरक्षण विभागातील सेवानिवृत्त वेतनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.