निरोगी व स्वस्थ कुटुंबाची गुरुकिल्ली संतुलित व सकस आहार – डॉ. स्नेहलता बागले

केडगाव दि.१० मार्च (प्रतिनिधी)
केडगांव जागरूक नागरिक मंच आयोजित जागतिक महिला दिन विशेष ऑनलाइन आहार मार्गदर्शन करताना तज्ज्ञ डॉक्टर स्नेहलता बागले यांनी आहाराचे व व्यायामाचे महत्व विशद केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्टफूड संस्कृतीमध्ये महिलांच्या स्वतः व कुटुंबाच्या संतुलित व सकस आहाराकडे दूर्लक्ष होते. वेळ त्यामध्ये महत्त्वाचे कारण आहे. परंतु फास्टफूड चे दूरगामी दुष्परिणाम शरीरावर होतात आणि त्यातून विविध व्याधींना सामोरे जावे लागते त्यामुळे कुटुंबाचे व स्वतः चे स्वास्थ्य टिकवण्यासाठी वैविध्यपूर्ण व पौष्टीक आहार घेण्याकडे कल असावा तसेच कुपोषणमुक्तीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत आनंदी जीवन जगण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम करावा. विविध प्रकारचा संतुलित आहार मार्गदर्शन करताना डॉक्टर बागले यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली विविध आजार व त्यावरील आहार यांबाबत प्रश्नोत्तरात मार्गदर्शन झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून या मार्गदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला व श्रोत्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन लावावे ही विनंती केडगांव जागरुक नागरिक मंचाकडे केली. व मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले प्रसंगी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे खजिनदार प्रवीण पाटसकर सदस्य सुनील नांगरे, मंदार सटाणकर उस्मान गणी मन्यार , आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर बागले उपस्थित होते. सायबर सेलचे अध्यक्ष अतुल ढवळे व सदस्य आदींनी परिश्रम घेतले.