मला डिवचु नका अन्यथा तुमचे कपडे काढायला वेळ लागणार नाही:आमदार निलेश लंके टाकळी ढोकेश्वर मध्ये ३ कोटी १८ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ! पाकीटमारी राजकारण हा आमचा धंदा नाही !

पारनेर( प्रतिनिधी) :
आमचा कारखाना अथवा शैक्षणिक संस्था नसून मी आपल्यासारखा काचेच्या घरात राहत नाही त्यामुळे मला डिवचु नका अन्यथा मला तुमचे कपडे काढायला वेळ लागणार नाही असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी विरोधकांना टाकळी ढोकेश्वर येथे दिले आहे.तर दुसरीकडे कोरोना काळात नागाच्या विळख्यात राहुन कोव्हिड सेंटर जीवावर उदार होवून चालविले आहे.त्यावेळी तुम्ही कोठे होते असा सवालही आमदार निलेश लंके यांनी विरोधकांवर केला आहे.पैसे कमाविण्यासाठी आपण राजकारणात आलो नसुन निस्वार्थी भावनेने गोरगरीब जनतेसाठी आम्ही काम करत आहे.शुन्यातुंन आमदार निलेश लंके याने माय बाप जनतेच्या जीवावर निवडणूक लढली आहे.निलेश लंके तुमच्या सारखे काचेच्या घरात नाही माझे घर साधे आहे.
दमबाजी व संघर्ष करून आम्ही पुढे आलो आहे चार टकारांना दारू पिऊन रात्री अपरात्री दमबाजी करू नका दिवसा ढवळ्या समोर या मग निलेश लंके काय आहे हे दाखवितो असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.आपल्याकडे खादी घालून लोक आपल्याकडे आले असता खिशातुन बोटाने नोट काढणारे आपण आहात अशी टिका सुजित झावरे यांचा नामोल्लेख टाळून आमदार निलेश लंके केली आहे.मी कधी पैशासाठी कधीही राजकारण समाजकारण केले नाही.राजकीय कारकीर्द फायदा घरे भरविण्यासाठी केला नाही माझ्या गोरगरीब जनतेसाठी करणार असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले.राज्याच्या नेत्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांनी चौकशी लावण्यासाठी फोन करतात प्रत्येकाची कुंडली आहे त्यामुळे डिवयाचाचे काम करू नका ना आमचा साखर कारखाना ना शैक्षणिक संस्था त्यामुळे आमच्या नादाला लागू नका या गोरगरीब जनतेच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी काम करायचे असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.मला ना कारखाना व शैक्षणिक संस्था काढायच्या असुन मला गोरगरीब जनतेच्या आधार व
डोळ्यात अश्रू पुसण्यासाठी हाॅस्पिटल काढणार असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले.
३ कोटी १८ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले.यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे नगर अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अशोकराव घुले, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्षा शालिनी घुले, कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र चौधरी, , निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सर, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, मांडवे खुर्द गावचे सरपंच सोमनाथ आहेर, कातळवेढा गावचे सरपंच पियुष गाजरे, वासुंदे गावचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, ज्येष्ठ नेते भागुजीदादा झावरे, महादू भालेकर, वासुंदे सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन रा. बा. झावरे रविंद्र झावरे अमोल उगले दत्तात्रय साळुंके टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणाताई खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, अभय नांगरे, कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त चंद्रभान ठुबे, सावरगाव उपसरपंच प्रदीप गुगळे, महेश झावरे, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे, रविंद्र गायखे, युवा नेते अमोल उगले, रावसाहेब बर्वे, बबनराव गांगड आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
आज आम्ही सरकार मध्ये नाही परंतु कधी येईल ते कळणार नाही ज्यावेळी येईल त्यावेळी पहिल्या पाच मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून असेल त्यावेळी दाखवुन देवु असा इशारा आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.पालकमंत्री माझ्या कार्यालयाची मंजूरी घ्यायची मग जिल्हात कार्यक्रम आयोजित करायचे हे चुकीचे आहे खालची पिलावळ फायली काढण्याची धमक्या दिल्या आहेत हिटलर नाही व हुकुमशाहीचा अंत काय जगाला माहित असुन अतिरेक कराल तर अंत नक्की असा टोलाही विरोधकाना आमदार निलेश लंके यांनी विरोधकांना लगावला आहे.निलेश लंके पासबुक आजही चेक करायचे पगारातून एक रूपया घेत नसुन शेकडो मुलांची शैक्षणिक फी भरता असतो.
प्रतिष्ठानच्या अकांऊट किती पैसे आहेत याची चौकशी करा परंतु काम करा मगच बोला असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी विरोधकांना लगावला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या जलजीवन योजनेचे अध्यक्ष माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ व या योजनेत राज्याचा विधानसभा सदस्य म्हणून मी असल्याचे आमदार निलेश लंके यांनी यासंबंधी पुरावे सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.ऑगस्ट मध्ये सरकार सत्तेवर आले असताना विकास कामे मंजूर करण्यांमध्ये आपण कोठे होता.येणारा निवडणुकीत आम्ही कोण आहोत हे दाखवून देणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.बोलण्या पेक्षा कृती वर भर देणारा मी असुन धरण धरण कुणी केले यांच्या खोलात जाणार आहे.
तालुक्यात बोटे दाखवायचे काम चालू आहे जनजीवन मिशन योजनेचा निधी मंजूर केला विरोधकांची केविलवाणी परिस्थिती तु धड ना ग्रामपंचायत सदस्य अथवा कोणत्याही पदावर नाही त्यामुळे विकास कामांवर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही असा टोला भाजपाचे नेते सुजित झावरे यांचे नाव न घेता लागवला आहे.
***** पाकीटमारी राजकारण हा आमचा धंदा नाही आमदार निलेश लंके
पाकीटमारी करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नसुन तालुक्यातील काहींचा तो धंदा आहे.पोटाला चिमटे घेवून १ लाख २३ महिलांना मोहटादेवी दर्शन घडविले असून तुम्ही महालक्ष्मी देवीसाठी घेवून जा.काम करायचे नाही फक्त टिका करायची एवढाच तुमचा धंदा असल्याची टिका सुजित झावरे यांचा नामोल्लेख टाळून आमदार निलेश लंके यांनी केली आहे.तर दुसरीकडे आमच्यावर टिका करणारांचे समाजासाठी योगदान काय काही लोकांचा राजकारण करायचा हा धंदा आहे तुम्ही ४२ हजार रूपयांना कोरोना काळात रेमडिशेव्हर कार्यकर्त्यांना विकले.त्यामुळे तुमचे कपडे काढायला वेळ लागणार नाही बाजार बुनग्यांनी आमदार निलेश लंके यांच्या वर टिका टिपण्णी करू नये आपली लायकी ओळखुन टिका करावी अशी टिका आमदार निलेश लंके यांनी
सुजित झावरे यांचा नामोल्लेख टाळून केली आहे.