चांदे खुर्द येथे जि. प. प्राथ. शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा!

चांदे (वार्ताहर) ५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.त्यांच्या जयंतनिमित्त कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथील जि. प. प्राथ. नुकताच शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील विदयार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिक्षक दिन साजरा केला. इयत्ता 3री व 4थी च्या विदयार्थ्यांनी शिक्षक होण्यासाठी वेशभूषा केली होती. तसेच जो विषय शिकवायचा आहे त्या विषयाची पूर्व तयारी केली होती. व तो विषय समजावून दिला. शिक्षक भूमिका पार पाडताना सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन डमरे सर व शिक्षक श्री दिपक कारंजकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी प्रतिक्रिया
मला आज शिक्षक झाल्यानंतर खूप आनंद झाला, तसेच शिक्षकांची भूमिका म्हणजे शिकवणे किती अवघड आहे हे समजले यापुढे मी माझ्या शिक्षकांचा कायम आदर राखीन.
विद्यार्थी -कार्तिक अशोक गंगावणे