डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळाकृती समितीचा हॉटेल सुखसागर येथे फलक !

अहमदनगर (प्रतिनिधी)23 सप्टे:-शहरातील मार्केटयार्ड समोरील हॉटेल सुखसागर व महापालिका अनेक वर्षांपासून या जागेवरून औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये वाद सुरू होता.या ठिकाणी सध्या हॉटेल सुखसागर आणि त्या शेजारील जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अशी परिस्थिती होती. मात्र या ठिकाणी पूर्णकृती पुतळा उभारून बाकीच्या जागेत बगीचा आणि सुशोभीकरण करावे अशी अनेक वर्षापासून आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली होती.मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे महानगरपालिका त्या ठिकाणी काहीच करू शकत नसल्याने अखेर औरंगाबाद हायकोर्टात या प्रकरणाचा निकाल लागला असून हा निकाल महानगरपालिकेच्या बाजुने लागला आहे व आज जागा खाली करण्यासाठी आंबेडकरी जनतेच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये चर्चा होऊन जागा खाली करण्यासाठी मुदतवाढ देऊन हॉटेल चालक यांचा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा कृती समितीच्या वतीने बुके देऊन सत्कार करण्यात आला.व हॉटेल सुखसागर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळाकृती समितीचा फलक लावला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीम वंदना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप,ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,अजय साळवे,परिमल निकम, सुनील क्षत्रे, सुरेश बनसोडे,सुमेध गायकवाड,रोहित (बंडू) आव्हाड, प्रतीक बारसे,सिद्धार्थ आढाव,सुशांत म्हस्के,कौशल गायकवाड,चंद्रकांत पाटोळे,योगेश साठे,महेश भोसले, विजय गायकवाड, विशाल भिंगारदिवे, नितीन कदम, सागर विधाते, संजू जगताप,सुरेश भिंगारदिवे,सुनिल शिंदे, बाप्पु विधाते, किरण दाभाडे, संजय कांबळे, अतुल भिंगारदिवे, सागर ठोकळ, प्रतीक बारसे, नगरसेवक प्रशांत गायकवाड ,गौतमी भिंगारदिवे,हिराबाई भिंगारदिवे,रेखा डोळस,आदीसह महिला उपस्थित होत्या.