राहुरी दि. 5 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
दिनांक 03/02/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमी मिळाली की बारगाव नांदूर गावातील शिवाजी चौकात एक इसम तलवार जवळ बाळगून फिरत आहे. सदर गोपनीय माहितीची शहानिशा करणे कामी व योग्य कारवाई करणे कामी पथक नेमले असता सदर पथकास इसम सुरज कृष्णा मंडलिक वय 23 वर्ष राहणार बारगाव नांदूर तालुका राहुरी हा माहितीप्रमाणे तलवार बाळगताना मिळून आला. म्हणून सदर इसमावर शस्त्र अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार लक्ष्मण औटी राहुरी पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री. वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी मा श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोल,ASI लक्ष्मण औटी,पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल ,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे , पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख pc भगवान थोरात pc नवले यांच्या पथकाने केलेली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येते की अवैध्य शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा