तात्पुरता फटाका विक्री प्रक्रिया सुरु करून 30 दिवसात परवाना देण्याची फटाका असोसिएशन ची मागणी फटाका असोसिएशनचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन

नगर – दि .१४ सप्टेंबर (प्रतिनिधी) अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने सण 2023 चे दिवाळी सणा करिता तात्पुरता फटाका विक्री परवाना 60 दिवसात सुरु करून 30 दिवसाच्या आत परवाना द्यावा असे मागणीचे निवेदन मा. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांना देण्यात आले. या वेळी असो. चे सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष गणेश परभणे, गजेंद्र राशीनकर,अरविंद साठे, संतोष तोडकर, अरविंद काळे, संजय जंजाळे, संजय सुराणा, दाजी गारकर, मयूर भापकर, रमेश बनकर, प्रितम तोडकर, पांडुरंग गाडळकर आदी उवस्थित होते.
या प्रसंगी असोसिएशन चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी भारत सरकार विस्फ़ोट विभाग नागपूर यांचे दिनांक 12/05/2016 रोजीचे पत्र जा. क्रमांक R.4(1)57/VI (Vol. VIII) बाबत परवानगी प्रक्रिया 60 दिवसात सुरु करावी व 30 दिवसाचे आत तात्पुरता फटाका विक्री परवाना दयावा अशी मागणी केली व सदर विक्री परवाना उशिरा दिल्यास व्यपाऱ्यांचे फार मोठे नुकसान होते या बाबत माहिती दिली असता सदर मागणी मा. निवासी जिल्हाधिकारी यांनी तातडीने मान्य करून संबंधिताना आदेशही दिले त्या बद्दल असोसिएशन चे वतीने मा. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांचे आभारही मानण्यात आले.