रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रीय अध्यक्ष मा ना रामदास आठवले यांची भेट

मुंबई दि.१२ (प्रतिनिधी)- मुंबई येथील शासकीय विश्रामगृह येथे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या कामकाजाविषयी तसेच पक्ष वाढी संदर्भात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व जिल्ह्याच्या वतीने ना साहेबांचा सत्कार केला. ना आठवले साहेबांनी त्यांच्या कार्यालयामध्ये ४० मिनिटांची बैठक शिष्टमंडळासोबतची आयोजित केली. प्रत्येक तालुक्याची माहिती घेतली, प्रत्येकाची मते जाणून घेतली व चर्चेअंती असे कळविले की पुढील निर्णय राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा श्रीकांत भालेराव साहेब घेतील. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, उमेश आमटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.