रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले १७ व १८ ऑगस्टला अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर!

अहमदनगर (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले १७ व १८ ऑगस्टला अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले दि.१७ ऑगस्टला पुण्याहून अ.नगर शहरात दु.१२.३० वाजता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय साळवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.पुढे नगरहून र्शिडी येथील येथील शासकीय विश्रामगृहावर येणार असून दुपारी ३ वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
सायंकाळी ५.३० वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष दिवंगत श्रावण वाघमारे यांच्या शोकसभेला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.दि.१८ ऑगस्टला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शिर्डीहून अहमदनगर मार्गे कडा (जि.बीड) या ठिकाणी लग्नसमारंभात उपस्थित राहणार आहे.दु. २.३० वा.अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद व आगामी नगरपरिषदा व जिल्हापरिषद निवडणुकी संदर्भात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष साळवे यांनी दिली.या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या समवेत आरपीआयचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,विभाग अध्यक्ष भिमराज बागुल,राजाभाऊ कापसे,विजय भांबळ,विजय वाकचौरे,अ.नगर शहर अध्यक्ष किरण दाभाडे,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,बाळासाहेब गायकवाड,विनोद भिंगारदिवे,शहराध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे,महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर,मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष महेंद्र झिंजाडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लोकेश बर्वे,गौरव साळवे,चंद्रकांत सोनवणे,श्याम भोसले,नगर ता.अध्यक्ष अविनाश भोसले,कर्जत ता.अध्यक्ष संजय भैलुमे,जामखेड ता.अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,पाथर्डी ता.अध्यक्ष बाबा राजगुरू,शेवगाव ता.अध्यक्ष विजय बोरुडे,श्रीगोंदा ता.अध्यक्ष राजाभाऊ जगताप, अमित जाधव इ उपस्थित राहणार आहेत.१८ ऑगस्टला दु.१ वाजता अ.नगर येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.