दरोड्याच्या तयारीत असलेले 3 आरोपी 1,47,800/- रुपये किंमतीचे साधनासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. 29 मे (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, संतोष खैरे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ व संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे स्थागुशा पथक आरोपींची माहिती काढत असतांना पथकास दिनांक 26/5/2024 रोजी इसम नामे आदिक आजगन काळे रा. म्हसणे, ता. पारनेर हा त्याचे इतर 7 ते 8 साथीदारांसह 3 मोटार सायकलवर येवुन वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणारे रोडवर ओढयामध्ये, वेठेकरवाडी शिवार, ता. श्रीगोंदा येथे थांबुन कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात दबा धरुन बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वेठेकरवाडी शिवार, ता. श्रीगोंदा येथे जावुन खात्री करता अंधारात रोडचे कडेला, झुडपाच्या मागे काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु 4 इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले व 3 इसमांना शिताफीने योग्य त्या बळाचा वापर करुन ताब्यात घेतले व सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे न दिल्याने ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नावे गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) आदिक आजगन काळे वय 50, 2) समीर आदिक काळे वय 22 दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर व 3) आकाश रविंद्र काळे वय 21, रा. गटेवाडी, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या साथीदारांची नावे विचारली असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे 4) वारुद भास्कर चव्हाण (फरार), 5) कोक्या भास्कर चव्हाण (फरार), 6) सतिष भास्कर चव्हाण (फरार), 7) अजय संतोष भोसले (फरार), सर्व रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा व 8) राहुल अर्पण भोसले (फरार), रा. म्हसणे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 1 कत्ती, 1 कटावणी, 1 सुरा, मिरचीपुड, 2 मोबाईल फोन व 1 होंडा कंपनीची मोटार सायकल असा एकुण 1,47,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ/रविंद्र तुकाराम घुंगासे ने. स्थागुशा यांचे फिर्यादी वरुन बेलवंडी पो.स्टे.गु.र.नं. 210/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
//2//
आरोपी नामे आदिक आजगन काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुन, खुनासह दरोडा, दरोडा, घरफोडी व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पारनेर 162/1999 भादविक 457, 379
2. श्रीगोंदा 170/2006 भादविक 395
3. पारनेर 351/2009 भादविक 395, 420
4. पारनेर 78/2010 भादविक 396
5. पारनेर 80/2010 भादविक 396
6. संगमनेर 70/2011 भादविक 395
7. सपा 83/2014 भादविक 143, 147, 324, 323, 504, 506
8. सुपा 130/2017 भादविक 420, 34
9. सुपा 91/2020 भादविक 302
10. सुपा 285/2021 भादविक 395, 420
11. सुपा 7/2024 भादविक 324, 323, 504, 506
आरोपी समीर आदिक काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुन, दरोडा तयारी व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सुपा 91/2020 भादविक 302
2. सुपा 416/2023 मपोका 142
3. सुपा 406/2023 भादविक 399, 402
4. सुपा 7/2024 भादविक 324, 323, 504, 506
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.