वृक्ष ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे कामही करतात छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे यांचे प्रतिपादन, स्नेहबंध व छावणी परिषदेतर्फे वृक्षारोपण!

अहमदनगर दि.२८ जुलै (प्रतिनिधी) – वृक्ष माणसांत आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतात. ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे कामदेखील झाडे करतात, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन व छावणी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने छावणी परिषदेच्या भिंगार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गितांजली पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सद्दाम कच्ची, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, झाडांकडे पाहण्यामुळे मनाला शांतता मिळते, मनावरचा तणाव कमी होतो. ज्या कार्यालयाच्या परिसरात अधिक झाडे लावलेली असतात, तिथले कर्मचारी खेळकर स्वभावाचे असतात, असे आता विज्ञानाने सप्रमाण सिद्ध केले आहे. रोजगार इमारती, वर्तमानपत्रे, पुस्तके आणि जवळपास १५ हजारांहून अधिक उत्पादनांसाठी कच्चा माल उपलब्ध होतो, तो केवळ झाडांमुळेच.
वृक्ष आहेत डॉक्टरही….
२ कोटी वृक्ष लावल्यास २६ कोटी टन जास्त ऑक्सिजन मिळू शकतो. त्याचबरोबर हे दोन कोटी वृक्ष वातावरणातला एक कोटी टन इतक्या मोठ्या प्रमाणावरील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यापेक्षाही जास्त झाडे लावली पाहिजेत, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.