राजकिय

मोदी सरकार काळात देशात बेरोजगारीचा विक्रम, युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरावे – किरण काळे 📌 माजी मंत्री थोरात, सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात युवकांचे मजबूत संघटन 📌 युवक काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल प्रशांत ओगले यांचा काळे यांच्या हस्ते सत्कार

अहमदनगर दि.२७ जुलै (प्रतिनिधी) : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यूपीए सरकारच्या काळात युवकांना रोजगाराच्या लाखो संधी देशांमध्ये निर्माण केल्या गेल्या मात्र मोदी सरकार काळात देशात युवकांच्या बेरोजगारीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यामुळे देशातील युवक अस्वस्थ असून संतापलेला आहे त्यांचा रस्त्यावर उतरावे असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक शासकीय विश्रामगृहावर काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी गौरव जयस्वाल, नगरसेवक आसिफ सुलतान, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख, शहर ब्लॉक युवक अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, माजी युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत ओगले यांची उत्तर महाराष्ट्र विभागाच्या प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल यावेळी काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उगले यांनी अहमदनगर पासून युवक काँग्रेसच्या संघटनात्मक दौऱ्याला सुरुवात केली आहे. नगरसह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्याचा ते दौरा करणार असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अहवाल सादर करणार आहेत.
यावेळी किरण काळे म्हणाले की, अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये माजी मंत्री, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, माजी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे मजबूत संघटन उभे राहिले आहे. आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसची महत्त्वाची भूमिका असणार आहे. आ. थोरात, सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून युवकांना ताकद देण्याचे काम पक्ष करीत आहे.
प्रशांत ओगले यावेळी बोलताना म्हणाले की, युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. सामान्य युवकाला यामुळे महत्त्वाच्या पदावरती स्वतःच्या कर्तुत्वाच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करत युवकांचे संघटन मजबूत करण्याचे काम त्यांनी करावं. त्यांच्या कामाचा आढावा प्रदेशाध्यक्ष राऊत हे स्वतः घेणार आहेत. काम करणाऱ्यांनाच इथून पुढे संघटनेमध्ये महत्त्व राहील. काम न करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रदेश स्तरावरून गंभीर विचार केला जाईल.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सिदनकर, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष संदीप वागस्कर, शहर सरचिटणीस जुबेर सय्यद, युवती सरचिटणीस वैष्णवी तरटे, शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरज गुंजाळ, श्रीगोंदा विधानसभा महासचिव शुभम लोणकर, नगर तालुका युवक उपाध्यक्ष सुरज साठे, सरचिटणीस अक्षय पाचारणे आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे