सरपंच सोमनाथ आहेर सारख्या तरुण व उमद्या सरपंचांमुळे गावचा कायापालट :आमदार निलेश लंके
ग्रामविकासाला अध्यात्माची जोड द्यावी ह भ प इंदुरीकर मांडव्यात १ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

पारनेर दि.२७ जुलै – (प्रतिनिधी )
गावातील विकास कामांची माहिती व त्या विकास कामांचा माझ्याकडे होत असलेला पाठपुरावा यामुळे सोमनाथ आहेर सारख्या तरुण-उमद्या सरपंचांमुळे माळी गावाला एवढे मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. तर दुसरीकडे गावातील प्रश्नांची जाण या सरपंचाला व पुढाऱ्याला असते त्यातूनच त्या गावचा विकास होत असतो असे प्रतिपादन आमदार लंके यांनी मांडवे येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवी खुर्द येथे १ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण शुभारंभ मांडव्याचे सरपंच
सोमनाथ आयरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सोमवारी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह शिवप्रहार संस्थापक अध्यक्ष संजीव भोर भागुजी दादा झावरे
बाळासाहेब खिलारी सरपंच सोमनाथ आहेर ऍड राहुल झावरे उपसरपंच सौ. कमल गागरे अंकुश पायमोडे दत्तात्रय निवडुंगे सुदाम शिर्के रावसाहेब बर्वे
ग्रामपंचायत सदस्य सौ. मनिषा जाधव, सौ.पूजा गागरे, सौ. रेश्मा गागरे, सौ. मंदाकिनी जाधव गौतम बागुल. सागर पवार, ग्रामसेवक खोडदे भाऊसाहेब श्रीरंग पाटील गागरे दिनकर दादा जाधव, विनायक जाधव पाटील, रावसाहेब पाटील गागरे, यशवंत जाधव, धावळू बागुल ज्ञानदेव आहेर, विठ्ठल ड्रायव्हर गागरे. सुधीर जाधव, रेवणनाथ गागरे, रावसाहेब तुळशीराम गागरे, कृष्णा पैलवान, बाळासाहेब जाधव, संतोष बागुल , कैलास दादा गागरे, मच्छिंद्र बर्डे, गणपत गागरे, नामदेव गागरे संतोष बागुल बाबासाहेब गांगड अमोल उगले दत्तात्रय साळुंखे पप्पु दाते भाऊ साठे दादा भालके यांच्या सह मांडवे खुर्द गावातील सर्व कार्यकारी संस्थांचे चेअरमन व्हाय चेअरमन सर्व संचालक पदाधिकारी, तसेच सरपंच सोमनाथ आहेर सर्व मित्र परिवार, तसेच गावातील सर्व लहानथोर तरुण व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की सरपंच आहेर यांनी आपल्या वाढदिवसाला समाज प्रबोधनाची जोड दिली असून विकास कामे कशी करावी व आणावी याचे हातोटी त्यांना असल्याचेही म्हणाले.
***** ग्राम विकासाला अध्यात्माची जोड द्यावी
समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर
सध्याच्या युगात समाज भरकट चालला असून या समाजाला दिशा देण्याची गरज आहे. त्यामुळे मांडव्यासारख्या गावाला सोमनाथ आहेर सारखा एक तरुण सरपंच लाभला असून तरुणांनी गावचा कायापालट करण्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे. ग्रामपंचायतचे माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियान वृक्ष लागवड शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरवत असताना मांडवे गावाला जो आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे तो जपण्याच्या काम या तरुणांनी भविष्य काळात करावे अशी आव्हान पण समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले आहे. तर दुसरीकडे विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन एक नवीन आदर्श समाज पद्धती उभी करत करण्याचे आव्हान सुद्धा समाजप्रबोधनकार इंदुरीकर यांनी केले आहे.