कौतुकास्पद

पारनेरश्री स्वामी समर्थ बँकेच्या टाकळी ढोकेश्वर शाखेचा वर्धापन दिन साजरा बँक अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मोबाईल बँकिंग सुविधा लवकरच उपलब्ध होणार : ऍड. अशोक शेळके

पारनेर दि.२६ जुलै (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणारी श्री. स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरी केले जात असून सोमवारी टाकळी ढोकेश्वर शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी १९९७ साली अॅड. अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली बँकेची स्थापना झाली. आज अखेर बँकेच्या मुख्य कार्यालय सह एकूण ११ शाखा अहमदनगर पुणे जिल्ह्यात कार्यरत असून संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र आहे.
श्री. स्वामी समर्थ बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण करताना आतापर्यंत निव्वळ एन. पी. ए. शून्य टक्के ठेवला आहे. बँकेने गेल्या २५ वर्षात सहकारात प्रगती करताना समाजातील विविध घटकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सहाय्य केले आहे. आज अखेर बँकेकडे २०० कोटी ठेवी असून एकूण गुंतवणूक १०३ कोटी आहे.
बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी कोअर बँकिंग प्रणाली, आर. टी. जी. एस/एन ई एफ. टी, लाॅकर सुविधा, ठेवीस विमा संरक्षण, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना एस. एम. एस. सुविधा,मिस कॉल अलर्ट अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आगामी काळात मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे बँकेचे चेअरमन अॅड.अशोक शेळके यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर येथे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांचा यावेळी सन्मान करण्यात आला अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी यावेळी बँकेचे चेअरमन ॲड.अशोकराव शेळके, संचालक अंबादास झावरे, तारकराम झावरे साहेब, बाजीराव झावरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य इंजि.प्रसाद झावरे,जनरल मॅनेजर गणेश सुपेकर साहेब प्रमुख पाहुणे सिताराम खिलारी सर,अशोकशेठ कटारिया,बाजार समिती उपसभापती विलास झावरे, विलास गोसावी,अमोल साळवे,बबनराव चिकणे,बबनराव गायके सर, शिवाजी खामकर,भगवान वाळुंज,दादाभाऊ नवले,दिलीपराव पाटोळे, विठ्ठलराव वाळुंज,भाऊशेठ सैद,बाळासाहेब झावरे,जालिंदर वाबळे रा.बा.झावरे,इंजि.सुनिल दाते,राजेंद्र झावरे,पी.डी.बर्वे,मा.कु.उगले,
प्रल्हाद भालेकर,राजेंद्र दाते, रामदास गाढवे,प्रमोद झावरे, हरिभाऊ नरसाळे, डॉ.मनोहर रांधवन, शिवाजी शिंगोटे, शिवाजी माने,बहिरु पागिरे,अशोक शेवंते, विठ्ठलराव गायकवाड, भाऊसाहेब दाते, प्रमोद झावरे,इंजि.निकिल दाते,अक्षय दाते,शुभम गुंदेचा आदी उपस्थित होते./प्तिनिधी :
अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणारी श्री. स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरी केले जात असून सोमवारी टाकळी ढोकेश्वर शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी १९९७ साली अॅड. अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली बँकेची स्थापना झाली. आज अखेर बँकेच्या मुख्य कार्यालय सह एकूण ११ शाखा अहमदनगर पुणे जिल्ह्यात कार्यरत असून संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र आहे.
श्री. स्वामी समर्थ बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण करताना आतापर्यंत निव्वळ एन. पी. ए. शून्य टक्के ठेवला आहे. बँकेने गेल्या २५ वर्षात सहकारात प्रगती करताना समाजातील विविध घटकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सहाय्य केले आहे. आज अखेर बँकेकडे २०० कोटी ठेवी असून एकूण गुंतवणूक १०३ कोटी आहे.
बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी कोअर बँकिंग प्रणाली, आर. टी. जी. एस/एन ई एफ. टी, लाॅकर सुविधा, ठेवीस विमा संरक्षण, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना एस. एम. एस. सुविधा,मिस कॉल अलर्ट अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आगामी काळात मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे बँकेचे चेअरमन अॅड.अशोक शेळके यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर येथे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांचा यावेळी सन्मान करण्यात आला अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी यावेळी बँकेचे चेअरमन ॲड.अशोकराव शेळके, संचालक अंबादास झावरे, तारकराम झावरे साहेब, बाजीराव झावरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य इंजि.प्रसाद झावरे,जनरल मॅनेजर गणेश सुपेकर साहेब प्रमुख पाहुणे सिताराम खिलारी सर,अशोकशेठ कटारिया,बाजार समिती उपसभापती विलास झावरे, विलास गोसावी,अमोल साळवे,बबनराव चिकणे,बबनराव गायके सर, शिवाजी खामकर,भगवान वाळुंज,दादाभाऊ नवले,दिलीपराव पाटोळे, विठ्ठलराव वाळुंज,भाऊशेठ सैद,बाळासाहेब झावरे,जालिंदर वाबळे रा.बा.झावरे,इंजि.सुनिल दाते,राजेंद्र झावरे,पी.डी.बर्वे,मा.कु.उगले,
प्रल्हाद भालेकर,राजेंद्र दाते, रामदास गाढवे,प्रमोद झावरे, हरिभाऊ नरसाळे, डॉ.मनोहर रांधवन, शिवाजी शिंगोटे, शिवाजी माने,बहिरु पागिरे,अशोक शेवंते, विठ्ठलराव गायकवाड, भाऊसाहेब दाते, प्रमोद झावरे,इंजि.निकिल दाते,अक्षय दाते,शुभम गुंदेचा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे