नगर शहरातील शिवसेनेतील आजी-माजी नगरसेवकांनी केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार! अहमदनगर शहरामधील पुतळे सुशोभीकरणासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार पाच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला मंजूर!

अहमदनगर दि.२१ जुलै ( प्रतिनिधी):-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व नेत्यांची संख्या खूप वाढत आहे.अशातच अहमदनगर शहरातील काही आजी,माजी नगरसेवक आज पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले.नगरसेवक योगीराज गाडे यांचाही यात समावेश आहे.नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे या अहमदनगरच्या माजी महापौर राहिल्या आहेत,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनिल शिंदे यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला होता.
गुरू पौर्णिमेच्या दिवशी नगरसेवक अनिल शिंदे हे मा.नगरसेवक सचिन जाधव व मा.नगरसेवक अनिल लोखंडे यांच्यासह एकनाथ शिंदे यांना भेटून आले होते.मागील महिन्यात शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचा मेळावा घेतला या मेळाव्याला अनिल शिंदे व काही नगरसेवक अनुपस्थित होते.काल (मंगळवारी) शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी घेतलेल्या मेळाव्यातही काही नगरसेवक अनुपस्थित होते. सायंकाळी शिवसेनेचे सहा नगरसेवक,काही माजी नगरसेवक व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले.एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या नगरसेवकां मध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव व महापालिकेतील नगरसेवक योगीराज गाडे,शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे,नगरसेवक अनिल शिंदे,मा.नगरसेवक सचिन जाधव,नगरसेवक मदन आढाव,नगरसेवक सुभाष लोंढे,माजी शहर प्रमुख मा.नगरसेवक दिलीप सातपुते,माजी नगरसेवक अनिल लोखंडे,सावेडी उपशहर प्रमुख शिवसेना चंद्रकांत (काका) शेळके,आकाश कातोरे,मयूर राऊत आदींचा यात समावेश आहे.अहमदनगर शिवसेनेने आजी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंचा भव्य सत्कार ही यावेळेस केला.तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर शहरा मधील पुतळे सुशोभीकरणासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.