आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती:आदित्य ठाकरे

अकोला( देशस्तंभ न्यूज नेटवर्क)आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती. अशा
“त्या “गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे तडफदार नेते आदित्य ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना अकोल्यातील बाळापूर येथे शेतकरी संवाद मेळाव्यात व्यक्त केला.
आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार असून तुम्ही सज्ज रहा. लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. शिवसेनेची खरी ताकद हे सच्चे शिवसैनिक आहेत. हे सच्चे लढवय्ये माझ्या पिढीसाठी आदर्श आहे. जनतेमुळे मोठे झालेले 40 गद्दार महाराष्ट्रातून पळून गेले आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात करुन हे सरकार स्थापन केले आहे. ते कोसळणारच असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.