डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आदर्श: पोलीस उपनिरीक्षक भावना भिंगारदिवे

अहमदनगर दि.३ जुलै (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आदर्श असून भारत देशातच नव्हे तर त्यांच्या विद्ववत्तेमुळे व शिक्षणामुळे त्यांना जगात आज लोक मानतात.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदावर पोहचले आहे.असे प्रतिपादन नव्यानेच उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या भावना भिंगारदिवे यांनी केले.सिद्धार्थनगर येथील जिजामाता मुलींचे वसतिगृह येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर बोलत होत्या.यावेळी भिंगार कॅन्टोन्मेंटचे माजी उप अध्यक्ष आरपीआय चे ज्येष्ठ नेते झेव्हियर भिंगारदिवे,सौ.भिंगारदिवे ताई, माजी नगरसेवक अजय साळवे,देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संस्थापक संपादक महेश भोसले,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,प्रा.जयंत गायकवाड,अजय भिंगारदिवे सर,जिजामाता वस्तीगृहाच्या अधिक्षिका जोती मोकळ मॅडम,नितीन कसबेकर,सारंग पाटेकर,अक्षय यादव सर,संघमित्रा अक्षय यादव,जयंती जयंत गायकवाड, जुईली जयंत गायकवाड,दिक्षांती सारंग पाटेकर,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपनिरीक्षक भावना भिंगारदिवे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी व इतर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी आज शासकीय सेवेत आहे.मी नशीब किंवा लक वगैरे काही मानत नाही.अभ्यास करणे हेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन,प्रा.जयंत गायकवाड, यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन कसबेकर यांनी केले.