प्रशासकिय

सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी ती जिद्द पूर्णच केली – पोनि यादव

कर्जत( प्रतिनिधी) : दि २६ जून
सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक पटकावण्याची जिद्द केली होती. ती ५ जून रोजी पूर्ण झाली त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून यासर्व शिलेदारांचे अविरत ६३४ दिवसांचे स्वच्छतेचे आणि वृक्षारोपनाचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. ते कर्जत पोलीस ठाणे आयोजित श्रमप्रेमी सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कर्जत पोलीस विभागाच्यावतीने १० वृक्ष भेट देत सर्व श्रमप्रेमीचा सत्कार करण्यात आला. यासह कर्जत पोलीस ठाण्यात रविवारी संयुक्त श्रमदान पार पडले.
कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा २ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. या यशात कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीचे भरीव योगदान राहिले आहे. या सर्व श्रमप्रेमीनी मागील ६३४ दिवसांपासून स्वच्छता अभियान यासह माझी वसुंधरा स्पर्धेत लोक चळवळ उभारत शहरातील अनेक भागाचे रुपडे बदलले आहे. राज्यात कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्या अनुषंगाने रविवार, दि २६ रोजी कर्जत पोलीस विभागाच्यावतीने सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीचा सन्मान ५ वडाची आणि ५ चाफ्याची वृक्ष भेट देत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. तसेच कर्जत पोलीस ठाण्यात एक दिवसाचे श्रमदान देखील करण्यात आले. यावेळी बोलताना सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वन अधिकारी अनिल तोरडमल म्हणाले की, सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी आणि कर्जत नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने लोकचळवळ उभारून स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरित कर्जतसाठी मोठे भरीव कार्य संपन्न झाले आहे आणि भविष्यात ते पुढे देखील अखंड चालू राहणार आहे. कर्जत पोलीस ठाण्यातील आजचा सन्मान निश्चित आमच्या सर्वासाठी प्रेरणादायी राहील असे म्हणत पोलीस विभागाचे आभार मानत धन्यवाद दिले.

*****यादव साहेबांचा लाडका सामाजिक संघटनेचा शिलेदार
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मोठे चिरंजीव गिरीराज हा सर्व सामाजिक संघटनेचा एक नियमित श्रमप्रेमी आहे. तो रोज जेथे नियोजित श्रमदान असते त्या ठिकाणी हजर राहून आपले श्रमदान पार पाडतो. आज देखील तो कर्जत पोलीस ठाण्यात पार पडलेल्या श्रमदानात पिवळा टी शर्ट परिधान करून हजर होता.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे