प्रशासकिय
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी प्रसिध्द होणार

अहमदनगर,दि.२५ जून (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीच्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावास नाशिक विभागीय आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. तेव्हा याबाबतची अंतिम अधिसूचना २७ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.