आरोग्य व शिक्षण

जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

अहमदनगर, 22 जून‌ ( प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दि. २१ जुन २०२२ रोजी ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योगदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सकाळी ७ ते ८ यावेळेत योग वर्गाचे आयोजन मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या योग वर्गात आयुष मंत्रालय भारत सरकारने निर्देशीत कॉमन योग प्रोटोकॉल प्रमाणे योगासने, प्राणायाम, ध्यान करण्यात आले. यावेळी जिल्हा रुगग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचर्य विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगवर्गाचे तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमदाडे यांच्या हस्ते वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना धोंडे-बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. महारूद्र खरपाडे, डॉ. सचिन सोलट, जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती. व्ही. आर. गायकवाड, अधिपरिचारिका श्रीमती छाया जाधव, श्रीमती. सिमा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जमदाडे यांनी योग शास्त्राचा रोगोपचार आणि स्वास्थ रक्षणासाठी महत्व विशद केले ते म्हाणाले, आरोग्यदायी जीवन शैली म्हणजेच योग्य आहार, योगोपचार व संतुलीत विचार या त्रिसुत्रीचे पालन केल्यास रोग टाळता येतात व आरोग्य कायम राहते,
जिल्हा रुग्णालयाच्या आयुष कक्षामध्ये योग विभागात दररोज नागरिकांना योग सहज देण्यात येतो. या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. वरिष्ठ वैद्यकेय अधिकारी डॉ. दर्शना, धोंडे यांनी दररोज योग्याभ्यास करण्यासाठी आवाहन केले. योगामध्ये सातत्य असल्यास मन व शरीर निरोगी राहते व सुदृढ राहते असे त्यांनी सांगितले. यावेळी अधिसेविका श्रीमती. व्ही. आर. गायकवाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खटके यांनीही मार्गदर्शन केले.
दि. १ जून ते २१ जुन दरम्यान जिल्हा रुग्णालयात योग प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. याचाही समारोप यावेळी करण्यात आला. यावेळी योगासन संबंधी पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
योग वर्गाचे संचालन जिल्हा रुग्णालयाच्या योगतज्ञ श्रीमती मोहिनी जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. इर्षाद मोमीण, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. नाझीया शेख, डॉ. शोभा धुमाळ, औषध निर्माता श्रीमती माधुरी ठोंबरे, श्रीमती संगीता नन्नवरे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे