अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित सद् भावना चषक हॉलीबॉल व फूटबाॅल स्पर्धेचा समोरोप हॉलीबॉल विजेता संघ एमआयआरसी (आर्मी) तर फुटबॉलचा युनिट फुटबॉल क्लब संघ विजेता

अहमदनगर दि.१९ जून (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित सद्भावना चषक फूटबाॅल व हॉलीबॉल स्पर्धा २०२२ चा समोरोप अहमदनगर पोलिस मुख्यालयाच्या ग्राऊंडवर झाला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याहस्ते विजेत्या फूटबाॅल व हॉलीबॉल संघांना ट्रफी देऊन गौरविण्यात आले. हॉलीबॉल स्पर्धेत एमआयआरसी संघ व पोलीस मुख्यालय संघामध्ये अंतिम सामना झाला यामध्ये गुणांची कमाई करून एमआयआरसी संघ विजयी झाला. व द्वितीय विजेता अहमदनगर पोलीस संघ ठरला. यात उत्कृष्ट खेळाडू – कर्ती, बेस्ट सेटर – मनोज चौधरी तर बेस्ट डिफेंडर – सागर तावरे. तर फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना युनिट फुटबॉल क्लब विरुद्ध सुमन एंटरप्रायझेस फूटबॉल क्लब यामध्ये झाला. युनिट फुटबॉल क्लबने एक गोल करुन विजय संपादन केले तर द्वितीय क्रमांक सुमन एंटरप्रायझेस फूटबॉल क्लब ठरले. यात उत्कृष्ट खेळाडू- अझर शेख, बेस्ट हाप- राॅबर्ट तर बेस्ट डिफेंडर – वदन ठरला. यावेळी पोनि डांगे व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचा-यांसह फूटबाॅल व हॉलीबॉल खेळाडूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फूटबाॅल व हॉलीबॉल स्पर्धा यशस्वीतेसाठी पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक मडमे साहेब, श्री राखीव पोलीस उपनिरीक्षक नाईक, मुख्य स्पोर्टस् इन्चार्ज व्हिकटर जोसेफ, स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश मोरे, फूटबाॅल संघटनेचे उपाध्यक्ष खालीद शेख, सहसचिव राॅनफ फडर्निस, मंगेश दाभाडे, मारुती माळी, कपिल गायकवाड, गणेश पाटील, अन्वर सय्यद, गितेश गायकवाड, गोपीचंद परदेशी, प्रदीप जाधव आदिंनी परिश्रम घेतले.