टाकळी ढोकेश्वर सोसायटीवर शिवसेना, मित्र पक्षांचे वर्चस्व सभापती काशिनाथ दातेंनी केला सत्कार : राष्ट्रवादीचा दारुण पराभव

पारनेर दि.१६ जून (प्रतिनिधी)
तालुक्याचे लक्ष असलेल्या सभापती काशिनाथ दाते सर यांच्या जिल्हा परिषद गटातील टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना व मित्र पक्ष प्रणित जनसेवा पॅनलने १३ पैकी १० जागा जिंकून वर्चस्व कायम राखले. विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत श्री ढोकेश्वर शेतकरी पॅनलचा पराभव झाला. त्यांना तीन जागांवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
जनसेवा पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी सर, बबनराव पायमोडे सर, नारायण झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी यांनी केले. १३९ सभासदांना वाढूनही सभासदांनी विकासकामांना स्वीकारले टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते त्यामुळे मतदान शांततेत पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांनी काम पाहिले.
विविध मतदार संघातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी झावरे विलास रामदास – ५५३, झावरे नारायण यशवंत – ५१०, पाटील महेश गोवर्धन – ४९८, खिलारी शिवाजी काशिनाथ – ४५०, धुमाळ मल्हारी गणपत – ४३७
महिला राखीव : बांडे अलकाबाई नानासाहेब – ४९७, गोरडे सुंदराबाई भाऊसाहेब -४९१
अनुसूचित जाती जमाती : गायकवाड श्रावण गोपाळा – ५४६
इतर मागास प्रवर्ग : रांधवण मोहन शंकर – ४७५
भटक्या विमुक्त जाती जमाती : जेजुरकर दौलत मारुती – ५०४
सर्व जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयी झाले तर झावरे जयसिंग बबन – ४५२, पायमोडे बबन सावळेराम – ४४५, बांडे बबन सोनबा – ४३० ढोकेश्वर पॅनलचे विजयी झाले.
********* टाकळीढोकेश्वर गावात अशांतता निर्माण झाली होती, दहशतीचा खात्मा झाला, निधी ग्रामपंचायतीचा, तो आमदारांचा सांगायचा, ही लबाडी लोकांच्या ध्यानात आली सभासदांनी विकास स्वीकारला, चांगल्या विचारांचा विजय झाला : शिवाजी खिलारी, माजी सरपंच टाकळी ढोकेश्वर
सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी सर, बबनराव पायमोडे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपतालुका प्रमुख सुनिता मुळे, गटप्रमुख अक्षय गोरडे, किसनराव धुमाळ, शाखाप्रमुख पांडे नाना, सुनिल गोरडे, बाबा झावरे, बापू रांधवन, भाऊसाहेब खिलारी, दिपक साळवे, शिवाजी गायकवाड, मळीभाऊ रांधवण, अशोक पायमोडे, रघुनाथ खोपटे, पोपट झावरे, बाळासाहेब खिलारी साहेब, संजय झावरे, रंजन निवडूंगे, शिवाजी निवडूंगे, दिलीप खिलारी साहेब, पांडुरंग गोरडे, सुभाष खिलारी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.