कौतुकास्पद
उत्तकृष्ट कार्याबद्दल अति सिव्हील सर्जन डॉ.मनोज घुगे यांचा देशस्तंभ न्यूज परिवाराच्या वतीने सत्कार!

अहमदनगर दि.१ जून (प्रतिनिधी) कोरोना सारख्या महामारीच्या कालखंडात शहरातील व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना अविरतपणे सेवा पुरवित सहकार्य करणारे तसेच जिल्हा रुग्णालयात सर्व बाबतीत सहकार्य करणारे जिल्हा रुग्णालयातील अति सिव्हील सर्जन डॉ.मनोज घुगे यांचा उत्तकृष्ट कार्याबद्दल नुकताच देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थापक संपादक महेश भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जितेंद्र आव्हाड मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे,जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, सामजिक कार्यकर्ते अमित टेमरे,प्रकाश गलांडे,हिराबाई भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे,राणी शेलार आदी उपस्थित होते.