आमदार डॉ सुधीर तांबे यांची लिंपणगाव च्या सिद्धेश्वर मंदिरास सदिच्छा भेट

लिंपणगाव( प्रतिनिधी) नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी नुकतीच लिंपणगाव चे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आ डॉ सुधीर तांबे हे श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी लिंपणगावचे जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी लिंपणगावच्या ग्रामस्थांनी भेटीपसंगी आमदार डॉ सुधीर तांबे यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिराचे पुजारी सौरभ गुरव यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार तांबे यांनी या मंदिराची पाहणी दरम्यान भारावून गेले. सिद्धेश्वर मंदिराची रचना ही हेमाडपंती व पौराणिक असून, लिंपणगाव पंचक्रोशीतील ऋषीमुनींच्या काळातील या मंदिराची अत्यंत प्रेरणादायी रेखीव कामातून हे मंदिर उभारले गेले आहे. या मंदिराचा परिसर अत्यंत नैसर्गिक दृष्ट्या रम्य असून, ग्रामस्थांनी या मंदिराचे उत्तम प्रकारे पावित्र्य राखले. असे सांगून आमदार तांबे पुढे म्हणाले की,जिल्ह्यातील हे लिंपणगावचे एकमेव पौराणिक व हेमाडपंथी मंदिर आहे. निश्चितच भाविक भक्तांच्या नवसाला पावणारे हे सिद्धेश्वर मंदिर असून, भाविकांसह लिंपणगावकरांचे हे भाग्य आहे. असे सांगून आमदार डॉ सुधीर तांबे यांनी मंदिराची बारकाईने पाहणी केली. उपस्थित ग्रामस्थांनी भेटी प्रसंगी सत्कार केल्याबद्दल आमदार डॉ सुधीर तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी भेटीदरम्यान आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास लिंपणगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष दादा कुरुमकर, माजी चेअरमन लक्ष्मण भोईटे, बापूराव कुरुमकर, शामराव लष्करे, ईश्वर रेवगे, विजय कुरुमकर, नाना कुरुमकर, गजेंद्र कुरुमकर, सुभाष कुरुमकर ,पप्पू ठोमसकर, मनोज खराडे, दादा माने, गजानन कुरुमकर, अतुल खळतकर, लक्ष्मण हांडे, रमेश ओहोळ ,मधुकर होलेे, रामभाऊ टुले, गोविंद लष्करे, संपत होले, संभाजी लष्करे, अशोक होले, रवींद्र भोंडवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुराज कुरुमकर यांनी केले. तर आभार दादा कुरुमकर यांनी मानले.