अहमदनगर दि. 23 एप्रिल (प्रतिनिधी )
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 23/4/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर अशांना पेट्रोलिंग करुन गोमास वाहतुक व विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन मिळुन आल्यास कारवाई करण्याच्या सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना पथकास इसम नामे सलमान शेख हा 1 पांढरे रंगाचे स्विफ्ट कार व आवाईज कुरेशी हा त्यांचेकडील 1 पिकअप मधुन जेऊर, ता. नगर येथुन संभाजीनगर कडे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतांना ते गांवशीय जातीचे गोमांस व जिवंत जनावरे कत्तल करण्याची मनाई असताना घेवुन जाणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने दिनांक 23/04/24 रोजी जेऊर गांवात कोल्हुबाई कोल्हार जाणारे रोडला चौकामध्ये सापळ लावुन थांबलेले असतांना थोडाच वेळात जेऊर गावाकडुन पथकाचे दिशेने संशयीत वाहने येताना दिसली. पथकाची खात्री होताच पांढरे रंगाचे स्विफ्टकार व पिकअप चालकास थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही चालकांनी वाहने थांबविली. दोन्ही चालकांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सलमान अजीज शेख वय 28 रा. घासगल्ली, कोठला मैदान, अहमदनगर व 2) आवाईज सलाम कुरेशी वय 20, रा. कुरेशी मोहल्ला, जेऊर, ता. नगर असे सांगितले. दोन्ही वाहन चालकांचे ताब्यातील वाहनांची पहाणी करता त्यामध्ये गोमांस व गोवंशीय जिवंत जनावरे मिळुन आल्याने त्याबाबत विचारपुस करता वाहन चालकांनी गोमांस व गोवंशीय जिवंत जनावरांची कत्तल करण्या करीता वाहनामधुन औरंगाबादकडे घेवुन जात असल्याचे सांगितल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
ताब्यातील 2 आरोपीचे कब्जातुन 1,80,000/- रुपये किंमतीचे 600 किलो वजनाचे गोमास, 1,20,000/- रुपये किंमतीची 6 मोठी जिवंत जनावरे, 5,00,000/- रुपये किंमतीचा 1 पिकअप व 4,00,000/- रुपये किंमतीचा 1 स्विफ्टकार असा एकुण 12,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. /2024 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (क), 9 (अ)व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा