अहमदनगर दि. 23 ऑगस्ट (प्रतिनिधी ) भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दक्षता कमिटीची बैठक भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच घेण्यात आली.
यावेळी दक्षता कमिटी, ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक घेऊन, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दुर करण्यात जागृती व्हावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस
गौतमी भिंगारदिवे, मिरा देठे, कांचन भिंगारदिवे, अनिता कांबळे,शिला भिंगारदिवे, वंदना पातारे, कविता भिंगारदिवे, संगिता राक्षे, नंदा जगताप, शिवानी रासणे, अश्विनी मिठू, विजया जाधव अमोलिकताई, तसेच सामाजिक कार्यकर्ते व देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते देशस्तंभ न्यूजचे उप संपादक सुरेश भिंगारदिवे, सत्यवान नवगिरे, संजय ताकवले, अविनाश राक्षे आदी उपस्थित होते. यावेळी भिंगार पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक जगदीश मुलगीर यांचा सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा