केंद्रीय रस्ते वाहतुक मंञी यांना १९नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवणार काळे झेंडे: अविनाश पवार

पारनेर (प्रतिनिधी) अहमदनगर – पुणे महामार्गावरील वाढते अपघात व रस्ताच्या कडेला झालेले अनाधिकृत बांधकाम व त्यामुळे होत असलेले अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा यांच्या मिलीभगत मुळे नगर-पुणे महामार्गावर अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे व लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर उप अभियंता यांना पञ व्यवहार करुन सुपा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक नितीन कुमार गोकावे साहेब तसेच पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे याच्या सोबत बैठक होऊन १५ दिवसात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी लेखीत आश्वासन देऊन पण जर अहमदनगर- पुणे महामार्गावर अपघातात रोखण्यासाठी उपाय योजना केल्या नाही चेतक एंटर प्रायजेस च्या अपुर्ण कामं तसेच निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे रोडवर पडलेली खड्डे, तोडलेली अनाधिकृत डिव्हाडर,खचलेल्या साइड पट्या,गोलइ अथवा गावाच्या ठीकाणी दिशा दर्शक,तसेच नाव फलक नाहीत . तसेच 12 वर्ष टोल वसुली करणारी कंपनी साधा मदतीसाठी हेल्प लाइन नंबर किंवा अॅब्युलस सुद्धा चालू करू शकलेली नाही की महामार्गावर प्रवासावेळी स्वच्छतागृहे सुद्धा उपलब्ध केली नाही या सर्व गोष्टी साठी पञ व्यवहार करुन पण कसलीही खुलासा अथवा माहिती देत नसल्याने या सर्व गोष्टींचे गांभीर्य या अधिकारी वर्गाला नसल्याचे दिसून येते आहे तसेच चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोल वसुल करणारी कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे आर्थिक संबंध आहेत की काय हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाची चौकशी करून या सर्व गोष्टी चा विचार करुन याच्या वर कारवाई करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंञी श्री. नितिन गडकरी साहेब यांचे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे दाखवून निवेदन देणार असल्याचे मनसे चे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी तसेच सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के यांनी प्रसिद्धी पञका द्वारे जाहीर केले आहे.