मराठी मिशन वर्धापन दिनानिमित्त महिलांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना आपल्याला समाजात दिसत आहेत. पूर्वीची चूल आणि मूल ही संकल्पना महिलांनी मोडीत काढत आपल्या कार्याचा ठसा समाज मनावर उमटविला आहे.
दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीने सर्वांना ग्रासले असतांना या काळात महामारीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे,बिल कमी करणे,ऑक्सिजन उपलब्ध करून देणे,जेवण उपलब्ध करून देणे,व इतर सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मराठी मिशन वर्धापन दिनानिमित्त नुकताच रेव्ह शरद गायकवाड, अध्यक्षा डॉ. विजया जाधव,यांच्या हस्ते गौतमी भिंगारदिवे,वनिता बिडवे, मार्गरेट जाधव यांचा समाज भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांना आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध सामाजिक, राजकिय,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.