क्रिडा व मनोरंजन
पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार उद्या नगरमध्ये!
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- वाडीया पार्क क्रीडा संकूल येथे उपस्थित राहणार

अहमदनगर दि.27 मे (प्रतिनिधी) :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दिनांक 28 मे 2022 रोजी दुपारी 2 वाजता पुणे येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता भव्य, छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- वाडीया पार्क क्रीडा संकूल, अहमदनगर. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता वाकी ता. बारामती जिल्हा पुणेकडे प्रयाण